Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

व्यक्तिवेध

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी पवईच्या आयआयटीमध्ये मुलीने प्रवेश घेणे हे अघटितच होते. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. पण इराणसारख्या देशातून इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंगमध्ये पीएच.डी. करून पुढच्या संशोधनकार्यासाठी आयआयटीमध्ये एका महिलेने येणे, इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंग विभागात अध्यापन करणे, पीएच. डी.च्या चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही नक्कीच अप्रुपाची गोष्ट होय. मरयम बाघिनी या इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंगध्ये पीएच. डी. करणाऱ्या पहिल्या इराणी महिला आणि त्या आता पवईच्या आयआयटीमध्ये इलेक्ट्रॉनिक

 

इंजिनीयरिंग विभागात कार्यरत आहेत. इराणच्या शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पीएच. डी. आणि एम. एस. केले आहे आणि कॅमेरा, ईसीजी रेकॉर्डिग मशीनसारख्या साध्या साध्या नेहमीच्या वापरातल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी नवी सर्किट डिझाइन्स बनवण्याकरिता आयआयटीमध्ये त्या रिसर्च करीत आहेत. या नव्या डिझाइन्समुळे विजेची बचत मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. आजच्या घडीला इराणमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण जरी ६० टक्के झाले असले तरी इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंग हे क्षेत्र एखाद्या विद्यार्थिनीने निवडणे ही गोष्ट तिथे सामान्य समजली जात नाहीच. १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणी महिलांच्या अधिकारांचा जो संकोच झाला, शिक्षणाच्या आणि करियरच्या संधी त्यांना कायद्याने ज्याप्रकारे नाकारल्या तो इतिहास आठवला आणि आजही इराणी महिलांवरची विविध सामाजिक, कौटुंबिक बंधने लक्षात घेतली की मरयम बाघिनी यांच्या कर्तृत्वाने दिपायला होते. शरीफ युनिव्हर्सिटीमध्ये त्या ज्यावेळी शिकत होत्या त्यावेळी इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंग विभागात केवळ दोन विद्यार्थिनी होत्या. त्यापैकी एक अर्थातच स्वत: मरयम. आज मात्र परिस्थिती बरीच बदलली आहे आणि इराणमध्ये पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येशी स्पर्धा करण्याइतकी आहे. त्याचे कारण मरयम यांच्या निरीक्षणानुसार ‘रिसर्चसाठी प्रदीर्घ कालावधी देण्याची बरेचदा पुरुषांची तयारी नसते आणि ते रिसर्च अध्र्यावर सोडून लट्ठ आर्थिक लाभ देणाऱ्या नोकऱ्यांकडे वळतात.’ त्याचबरोबर महिलांना संधी नाहीत, ही गोष्टही त्या नाकारतात. ‘संधी खूप आहेत, पण इराण काय किंवा भारत काय, महिला स्वत:च्या क्षमतेविषयीच साशंक असतात आणि इंजिनीयरिंगसारखे क्षेत्र हे आपले नव्हे, तो पुरुषांचाच प्रांत असे गृहीत धरून चालतात. मी या समजुतीला आव्हान म्हणून उभे रहायचा निष्टद्धr(२२४)चय केला होता.’ मरयम यांनी तो निष्टद्धr(२२४)चय पुरा केला. अर्थात त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाकडूनही पूर्ण सहकार्य लाभले. अशी अनुकूल कौटुंबिक परिस्थिती अजूनही इच्छुक महिलांना लाभतेच असे नाही, याचीही जाणीव मरयम यांना आहे. पीएच. डी. आणि त्यानंतरचे संशोधनकार्य ही प्रदीर्घ काळ- किमान चार-पाच वर्षे तरी- चालणारी, तसेच चिकाटीची आणि धैर्याची परीक्षा घेणारी प्रक्रिया असते, विवाहानंतर फार कमी महिलांना या प्रक्रियेत टिकून राहणे शक्य होते, हेही त्या नमूद करतात. मात्र त्याचबरोबर या क्षेत्राविषयी आणि त्यातील संधींविषयी फारशी जाण समाजात नाही, हेही बजावतात. पीएच. डी. पुढच्या संशोधनकार्यासाठी मरयम यांनी भारताचीच निवड केली, कारण इथे येण्यापूर्वी या विषयात प्रकाशित झालेले जे जे संशोधन प्रबंध त्यांनी वाचले होते, त्यापैकी बहुसंख्य प्रबंध हे भारतातल्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचे होते. आयआयटीविषयी ओढ निर्माण झाली ती तिथून. २००१ साली मरयम बाघिनी आयआयटीमध्ये दाखल झाल्या. आता त्यांच्या संशोधनाचा प्रत्यक्ष परिणाम सिद्ध झालेला पाहीपर्यंत भारतातच राहण्याचा निष्टद्धr(२२४)चय त्यांनी केला आहे. शिवाय भारताची इराणशी असलेली भौगोलिक, सांस्कृतिक जवळीक, भारतीय परिसराकडून मिळणारा आपलेपणा हेही भारताची निवड करण्याचे आणखी एक कारण असल्याचे त्या सांगतात. या जवळिकीमुळे दैनंदिन जगण्यात फार तडजोडी कराव्या लागत नाहीत असा त्यांचा अनुभव.