Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

कैवल्याचा पुतळा : एक दर्जेदार प्रस्तुती
डॉ. सुलभा पंडित

अलीकडेच दिवंगत झालेले श्रेष्ठतम सारस्वत पुत्र, वाङ्मय वाचस्पती, प्रश्न. राम शेवाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर असा एक कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. ‘कैवल्याचा पुतळा’ हा विशेष कार्यक्रम त्यांना समर्पित करण्याचे कारण म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाच्या उभारणीसाठी प्रश्न. शेवाळकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि प्रश्नेत्साहन लाभले होते. हा कार्यक्रम प्रथम सादर झाला त्यावेळी त्यांच्या शुभेच्छा कलावंतांच्या पाठीशी होत्या. म्हणून कलावंतांच्या वतीने ही भावसुमनांजली त्यांना अर्पण करण्यात आली.

जसापूर येथे आगीत ११ घरे भस्म; १५ लाखांचे नुकसान
चांदूर बाजार, ११ जून / वार्ताहर

जवळच्या जसापूर येथील उल्हास नगरातील घरांना गुरुवारी अचानक आग लागून ११ घरे भस्मासात झाली. या घरातील २२५ क्िवटल कांदा, आठ हजारांची रोकड व कुटुंबातील महिलांचे सोन्याचे दागिने असे एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्रश्नथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फत्तूजी सावजी दहीकर यांची पत्नी सकाळी ११ वाजता स्वयंपाक करून बाहेर गेली असताना चुलीत शिल्लक राहिलेल्या ठिणगीने अचानक पेट घेतला व पाहता पाहता एका पाठोपाठ एका घराला आगीने वेढले.

महाराष्ट्रातील अव्वल विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक विवंचनेचे सावट
नरेश मेश्रामची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर व्हायची इच्छा
मदतीचे आवाहन
वरूड, ११ जून / वार्ताहर

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या वरूडच्या उत्क्रांती शिक्षण संस्थेचा विद्यार्थी नरेश भागवत मेश्राम याच्यापुढे त्याच्या आर्थिक विवंचनेमुळे पुढील शिक्षणाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. नरेशची इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर व्हायची इच्छा आहे पण, त्याच्या घरची परिस्थिती पुढील शिक्षण घेण्याची नाही.

हास्य लोपले
अनुराधा निवसरकर

नागपूरच्या कला, साहित्य, संस्कृती जगताचं लाडकं व्यक्तिमत्त्व माधवी म्हैसाळकर यांच्या धक्कादायक अपघाती निधनाला आज १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त-
१२ जून! आठवण आली की, धस्स होतं. सकाळी ११ वाजता फोन खणखणला, अरुणचा होता. त्यानं सांगितलं ‘माधवी अपघातात गेली’. धस्स झालं. खरं वाटेना, पुन्हा पुन्हा विचारलं तरी तेच उत्तर! जणू काही दहादा विचारून बातमी खोटी ठरणार होती. बट डेथ हॅज सच फायनालिटी! दोनच दिवस आधी पुण्याला मनोहर-माधवीनं आमच्याबरोबर पूर्ण दिवस घालवला होता.

अकोल्यात ट्रकच्या धडकेने दोघे ठार
अकोला, ११ जून /प्रतिनिधी

ट्रकच्या धडकेने मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी वाशीम बायपासवर घडली. मो. मतीन अ. रहमान (३२) आणि साजीद अली फारुक अली (३३) ही मृतांची नावे आहेत. यातील मो. मतीन अ. रहमान अकोल्यातील खदान भागात राहणारा तर साजीद अली फारुक अली गंगानगर परिसरात राहणारा होता. गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाशीम बायपासवरील सनी मोटर्सजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रकचालकाने जोरदार धडक देऊन पळ काढला. त्यानंतर दोघेही जागीच मरण पावले. जुने शहर पोलिसांनी धडक देणाऱ्या ट्रकचा शोध घेणे सुरू केले आहे.

धनादेश न वटल्यामुळे शिक्षा
भंडारा, ११ जून / वार्ताहर

पालांदूर येथील रामप्रभू गंगाराम कावळे याला धनादेश अवमान केल्याबद्दल तीन महिन्यांचा कारावास व ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश लाखनी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दिले. रामप्रभू कावळे याने रामदास सीताराम कापसे यांच्याकडून ऑगस्ट २००७ मध्ये ५० हजार रुपये घेतले होते. या रकमेची रामदासने मागणी केली असता, रामप्रभूने येथील क्षेत्रीय ग्रामीण बँकेचा ५० हजार रुपयांचा धनादेश त्याला दिला. दरम्यान, २३ फेब्रुवारी २००८ ला रामदास कापसे यांचा मृत्यू झाल्यामुळे धनादेश रामदास यांची पत्नी हेमलता कापसे यांनी वटविण्याकरिता बँकेत जमा केला. परंतु, धनादेशाची रक्कम न मिळता तो परत आला. त्यामुळे हेमलताने आरोपीविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल केले. प्रकरणाची सखोल चौकशी, साक्षीपुरावे व दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून लाखनी येथील न्यायदंडाधिकारी आरोपीस दोषी ठरवून रामप्रभू कावळे यास तीन महिन्यांचा साधा कारावास व ५० हजार रुपये नुकसान भरपाई हेमलता कापसे यांना एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादीतर्फे अॅड. दीपक जांभुळकर यांनी बाजू मांडली.

शैक्षणिक सत्रापूर्वी शिष्यवृत्तीची मागणी
मूर्तीजापूर, ११ जून / वार्ताहर

आदिवासी मुलींना देण्यात येणारी शिष्यवृत्ती शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी देण्यात यावी, अशी मागणी बहुजन शिक्षक संघटनेने केली आहे. जिल्हा पातळीवरील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी मुलींची इयत्ता ५ वी पासून शाळांमधून होणारी गळती व कुचंबणा थांबवण्यासाठी या प्रवर्गातील मुलींना दरमहा ५० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचे प्रश्नवधान आहे. मात्र, सन २००७-०८ व २००८-०९ या शैक्षणिक सत्रांमध्ये या शिष्यवृत्तीचे वाटपच झाले नाही.
प्रश्नथमिक शाळांतर्गत आदिवासी मुलींच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात येऊनही आदिवासी विकास कार्यालयाकडून शिष्यवृत्तीचे धनादेश अद्यापपर्यंत शाळांना पोहोचलेच नाही, असा आरोपही बहुजन शिक्षक संघटनेचे दिलीप सरदार, संदीप वाकोडे, सुनील डोंगरदिवे, दीपक कोकणे, एम.डी. शेजब, देशमुख, घोडेस्वार यांनी केला आहे.

‘बीपीएल’ शिधापत्रिकांची मागणी
बल्लारपूर, ११ जून / वार्ताहर

बल्लारपूर तालुक्यातील अनेक कुटुंबीयांची नावे दारिद्रय़ रेषेखालील यादीत असताना त्यांना आजतागायत शिधापत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यांना मुदतीत शिधापत्रिकांचे वाटप करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना शहर प्रमुख प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने तहसीलदार फुलसुंगे यांना मागणीचे निवेदन सादर केले. दारिद्रय़ रेषेखालील सर्व कुटुंबांना सवलती मिळाव्यात अन्यथा बल्लारपूर शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.शिष्टमंडळात विनोद यादव, प्रभाकर मुरकुटे, सोमेश्वर पद्मगिरवार, शांतीकुमार गिरमिल्ला, रामू मेदरवार, राकेश मंडल, संजय वर्मा, बाबा साहू, ए.जे. मिठानी, सरविंदर सिंह, सचिन देवतळे, तोसिक मिठानी, छाया वाघमारे, कल्पना गोरघाटे, निर्मला ठाकूर, श्रीकांत मारटकर, गणेश प्रधान, मनोज खांडवाये, संतोष भारती, रसिया निषाद, अरुण सिंघाला,आदींचा समावेश होता.

संगणक प्रणालीत हिंदीचा व्यापकरूपात वापर व्हावा- सुष्मिता भट्टाचार्य
भंडारा, ११ जून / वार्ताहर

भंडारा नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या बैठकीत बोलताना राजभाषा अनुसंधान अधिकारी सुष्मिता प्रणालीत राजभाषा हिंदीचा व्यापकरूपात वापरबद्दल उपलब्ध विविध योजनांची माहिती दिली. साफ्टवेअरला डाऊनलोड करण्याची माहिती देखील देण्यात आली. या उपक्रमाविषयी उपस्थितात साधकबाधक चर्चा झाली. सेन्ट्रल बँक नागपूरचे ओमप्रकाश काकडे यांनी वापर अधिक व्यवस्थित होण्याच्या वैज्ञानिक-डी केंद्रीय रेशीम बोर्ड भंडारा, आयकर अधिकारी नरेश कुमार यांनी चर्चेत भाग घेतला. अध्यक्षस्थानी एन्थोनी एक्का होते. आभार डॉ. एस.के. माथुर यांनी मानले. या दौऱ्यात सुष्मिता भट्टाचार्य यांनी राजभाषेच्या उपयोगासंबंधात भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक आणि सीमा व उत्पादन शुल्क कार्यालयाची पाहणी केली.

आर्णीत गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार
आर्णी, ११ जून / वार्ताहर

१२ वीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरी तर अमरावती विभागातून प्रथम आलेल्या अनुश्री प्रकाश बुब व विभागातून मागासवर्गीयात प्रथम आलेल्या आकांक्षा पाटील या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार पालकमंत्री मनोहर नाईक यांच्या हस्ते येथे एका कार्यक्रमात नुकताच करण्यात आला. अनुश्री बुब ही मूळ आर्णी येथीलच असल्याने आपला पहिला सत्कार आपल्या घरी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात अनुश्री शिक्षण घेत होती. वडील प्रकाश बुब व काका ठाकूरदास बुब हे दोघेही नोकरीसाठी पुसद व अमरावतीला स्थायिक झाले. निकाल लागला त्या दिवशी अनुश्री बुब हे पुसद येथे आपले काका ठाकूरदास यांच्याकडे होती. ठाकूरदास हे पुसद येथे प्रश्नचार्य आहेत. अनुश्री बुब हिने पुढे भारतीय प्रसासकीय सेवेत जाण्याचा विचार असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले. आकांक्षा पाटीलने मात्र आपल्याला ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर’ होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार संजय देशमुख, ख्वाजाबेग, शिक्षण सभापती देवानंद पवार, सरपंच राजू चिंतावार उपस्थित होते. माहेश्वरी मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थिनीचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कौटुंबिक कल्याण योजनेंतर्गत १३ लाखांचे धनादेश वितरित
गोंदिया, ११ जून / वार्ताहर

कौटुंबिक कल्याण योजनेंतर्गत तालुक्यातील १३० महिलांना प्रति महिला १० हजार रुपयांप्रमाणे १३ लाखाचे धनादेशांचे वाटप नुकतेच येथे करण्यात आले. गोंदिया तहसील कार्यालयाच्या प्रश्नंगणात आयोजित शिबिरात सदर धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी गोंदिया तालुक्यातील ८१६ अर्जदारांचे कागदपत्रे पूर्ण करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावे, असे निर्देश आमदार गोपालदास अग्रवाल यांनी तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार दिघोरे, नायब तहसीलदार नीलेश काळे, खंड विकास अधिकारी राऊत, शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष पृथ्वीपालसिंह गुलाटी, उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नागपुरे, पंचायत समिती उपसभापती प्रकाश रहमतकर, नगरसेवक शकील मंसूरी, आशा जैन, गुड्डू ठाकूर, दलितमित्र यु.एस. बोरकर या कार्यक्रमास उपस्थित होते.संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुढाकाराने गोंदिया तालुक्यात २५ शिबिरे घेण्यात आली.

६०० रुग्णांची आरोग्य तपासणी
चंद्रपूर, ११ जून / प्रतिनिधी

गिरीजा प्रतिष्ठानच्यावतीने येथील मातोश्री मंगल कार्यालयात नि:शुल्क रोगनिदान शिबिरात ६०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गिरीजा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वंदना हस्ते यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराकरिता नागपूर व चंद्रपुरातील तज्ज्ञ डॉक्टर्स अमित जयस्वाल, डॉ. पंकज हरकुट, डॉ. महम्मद फैजल, डॉ. मनीष ठाकरे, डॉ.चौधरी, डॉ. श्रीनिवासन, डॉ. कामरान, डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. अरूण कुळकर्णी, डॉ. संध्या कुळकर्णी, डॉ. रजनी शेंडे यावेळी उपस्थित होते. या शिबिरात कर्करोग, हृदयरोग, अस्थिरोग, मानसिक रोग, बालरोग, स्त्रीरोग, आयुर्वेद इत्यादी प्रकारच्या रोगांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. रोगनिदान शिबिरात जवळ जवळ ६०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. गिरीजा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वंदना हस्ते यांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त करून रुग्णांचे व डॉक्टरांचे आभार मानले. रोगनिदान शिबिराचे संचालन प्रश्न. प्रकाश शेंडे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रश्न. प्रमोद शंभरकर, राजू इंगोले, प्रश्न. प्रकाश शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

छावा संग्राम परिषदेचा ५१ हजार रोपे लावण्याचा संकल्प
भंडारा, ११ जून / वार्ताहर

ओबीसी व छावा संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नाना पटोले यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त छावा संग्राम परिषदेच्यावतीने संपूर्ण जिल्हाभर ५१ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर, ‘मला अधिकरी व्हायचे आहे’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना पटोले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख, आय.ए.एस. अकादमी अमरावतीचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे, पोलीस उपनिरीक्षक सिंगनजुडे, माजी उपसभापती देवराम परशुरामकर, ओबीसी संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गावंडे, तालुका छावा संग्राम परिषदेचे अध्यक्ष अनिल तोंडरे आदी उपस्थित होते. यावेळी छावा संग्राम परिषदेच्यावतीने ‘मला अधिकारी व्हायचंय’, जॉब प्लेसमेंट अँड करिअर गार्ड्सच्या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. शिबिरात ३४ जणांनी रक्तदान केले. त्यात रामचंद्र राऊत, व्यंकटेश शेंडे, हेमंत मेश्राम, गजानन दोनाडकर, फिरोज छवाटे, गंगाधर राऊत, अमोल मानकर, शिवराम ठाकरे, काशिराम परशुरामकर, निशाद लांजेवार यांचा समावेश आहे.

बोगस बियाणे कारखाना मालकाविरुद्ध गुन्हा
भंडारा, ११ जून / वार्ताहर

लाखांदूर तालुक्यातील इटान येथे उघडकीस आलेल्या बोगस बियाणे तयार करणाऱ्या कारखाना मालकाच्या विरोधात कृषी विभागाने अखेर लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप मेश्राम यांच्यासह एकूण तिघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
भंडारा जिल्ह्य़ात बोगस बियाणे तयार करून कंपनीचे बियाणे म्हणून विक्री करणाऱ्या प्रदीप गोविंद मेश्राम यांचे प्रकरण चार जून ला उघडकीस आले. गावातील लोकांकडून बियाणे घेऊन ते सुपर आर.पी. या नावाने तयार करून व्यवस्थित ‘पॅकिंग’ करून विकण्याचा प्रकार मेश्राम यांनी सुरू केला होता. त्यांच्या जागृती कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यावर हा प्रकार उघडकीस आला. ५ जून ला झालेल्या कारवाईत बोगस बियाणांचा साठाही ताब्यात घेण्यात आला होता. नागपूर येथील कृषी विभागाचे विभागीय निरीक्षक जुमळे यांनी अखेर लाखांदूर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी प्रदीप गोविंद मेश्राम, मेघनाथ चौबे व एस.एल. बन्सोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपी पसार असून त्यांच्या शोधात ठाणेदार गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक रवाना झाले आहे.

हनवतखेड शिवारात जीपच्या धडकेने मोराचा मृत्यू
बुलढाणा, ११ जून / प्रतिनिधी

सिंदखेडराजा तालुक्यातील हनवतखेड येथे जीपची धडक लागून मोराचा मृत्यू झाला. मोराची हत्याच झाली असून अपघाताचा बनाव केल्याचा आरोप हनवतखेडवासीयांनी केला आहे.
हिवरा गडलिंग येथील डॉ. शिवाजी विक्रम खरात जीपने (एमएच-२८-२७१९) हिवऱ्याकडे ९ जूनला सायंकाळी पाच वाजता निघाले परंतु, रस्त्यात हनवतखेड शिवारात त्यांनी मोराची हत्या केली, अशी तक्रार हनतवखेड येथील काही नागरिकांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात केली. हे प्रकरण वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पोलिसांनी घटनेची माहिती मेहकर येथील सहाय्यक उपवनसंरक्षकांना दिली. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी मृत मोराचा पंचनामा करून महेंद्र मॅक्स जीप जप्त केली. जीपच्या मागील चाकात येऊन मोराचा अपघाती मृत्यू झाल्याचे वन अधिकारी सांगत असले तरी यासंबंधी अधिक माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

पोहरादेवीच्या विकासासाठी १० कोटींची तरतूद
यवतमाळ, ११ जून / वार्ताहर

पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूद १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी येथे ४ ऑक्टोबरला सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देशमुख यांनी पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता ५० कोटी रुपये तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच या अधिवेशनात राज्य शासनाने अर्थ संकल्पात १० कोटी रुपये पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे.