Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १२ जून २००९

विविध

ऐन महत्त्वाच्या वेळीच वैद्यकीय आणि नागरी सेवा कोलमडल्या..!
‘इंडियन एक्स्प्रेस’ने मिळविलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबरला रात्री १०-३५ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून अग्निशमन दलाला पहिला फोन आला. ओबेरॉय-ट्रायडण्ट हॉटेलमध्ये अग्निशामक बंब पाठविण्याची विनंती करण्यात आली. दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये हातबॉम्ब फेकणे सुरूच ठेवले होते. १५ मिनिटांतच अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहोचले. रात्री १२-५० च्या सुमारास कंदहार रेस्तराँजवळच्या लॉबीत आग लागली. दहशतवादी तेव्हा हॉटेलच्या वरच्या मजल्यावर पोहोचले होते.

निदर्शने थांबवा; ऑस्ट्रेलियामधील भारतीय नेत्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
मेलबर्न,११ जून/पी.टी.आय.

ऑस्ट्रेलियामध्ये वांशिक विद्वेषातून होत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांच्या विरोधातील निदर्शने थांबविण्यात यावीत,असे आवाहन येथील भारतीय समुदायाच्या नेत्यांनी केले आहे. आधी करण्यात आलेल्या सर्व ‘रॅलीं’मधून भारतीयांच्या मागण्या योग्यरीत्या सरकापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत.

आता फ्रिदाच म्हणते देव आहे ‘लव्हली बॉय’!
लंडन, ११ जून/पी.टी.आय.

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यातील मुख्य कलाकार फ्रिदा पिंटो आणि देव पटेल यांच्या प्रेमाविषयी उठणाऱ्या वावडय़ांना खुद्द फ्रिदा पिंटो हिनेच विराम दिला आहे. या वावडय़ा खोटय़ा नव्हे, तर खऱ्या ठरवत. सध्या हॉलीवूडमधील प्रमुख १० सेलिब्रिटींच्या पंक्तीत जाऊन बसलेली २६ वर्षीय फ्रिदा देव पटेलला ‘लव्हली बॉय’ असे संबोधते.

लंडनवरून गोव्यास आलेल्या प्रवाशाला ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे उघड
पणजी, ११ जून/पी.टी.आय.

गोव्यामध्ये लंडनवरून आलेल्या दोन संशयित ‘स्वाइन फ्लू’ झालेल्या प्रवाशांपैकी एकाला या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे गोव्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांतर्फे उघड झाले आहे. हा प्रवासी लंडनहून जर्मनीमार्गे गोव्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याचे सचिव संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले.

अमिताभला शिकायची आहे चिनी भाषा
मकाव, ११ जून / पी.टी.आय.

आतापर्यंत जगातील अनेक भाषा शिकलो पण चिनी भाषा शिकण्याचा आता चांगला योग आला असून ही संधी मी सोडणार नसल्याचे सुपरस्टार अमिताभ बच्चन याने आज येथे बोलताना सांगितले. ‘आयफा’ सोहोळ्यासाठी बच्चनचे आज येथे आगमन झाले. या सोहोळ्याचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिटर’ असलेल्या बच्चनचे येथे चाहत्यांनी मोठय़ा उत्साहात स्वागत केले. हा सोहळा खरोखरीच उत्साहवर्धक असल्याचे सांगत बच्चन म्हणाला की या निमित्ताने चिनी भाषा सांगण्याची अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे. येत्या एक दोन दिवसात चिनी भाषेतील काही महत्वाचे शब्द कोणत्याही स्थितीत आत्मसात करणार असून सोहोळ्याच्या अंतिम कार्यक्रमामध्ये प्रयत्नपूर्वक चिनी भाषेतील शब्दांचा वापर करणार असल्याचे बच्चन याने सांगितले. सोहोळ्याच्या निमित्ताने येथे बऱ्याच वर्षांनंतर येण्याचा योग आला असेही तो म्हणाला.

लालूंचा वाढदिवस साधेपणाने साजरा
पाटणा, ११ जून / पी.टी.आय.

‘सूरज ना बदला चांद ना बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इन्सान’ प्रख्यात कवी प्रदीप यांनी गायलेल्या या ओळींचा संदर्भ देत लालूंनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. एकेकाळचा सहकारी मित्र असलेल्या कॉँग्रेसकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधत लालूंनी काहीशी नाराजी व्यक्त केली पण दुसऱ्या क्षणी ‘यह तो चलता ही रहता है’ असे सांगून वातावरणातील तणावही त्यांनी कमी केला. लालूंनी आज ६२ व्या वर्षांत पदार्पण केले खरे पण त्यानिमित्ताने कसलाही डामडौल नव्हता. सत्तेत असताना लालूंनी साजरा केलेल्या वाढदिवसाच्या तुलनेने हा रंग चांगलाच फिका पडला होता. सकाळी लालूंनी पत्नी राबडीदेवी यांच्यासह शहरातील प्रमुख मंदिरामध्ये जावून पूजा केली. त्यानंतर घरी केक कापण्यात आला. यावेळी राबडीदेवींनी केक भरवताच काही क्षण लालूही काही क्षण हरवून गेले. लालूंनी तेथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांना मनसोक्तपणे फोटो काढून दिले.

संयुक्त राष्ट्रांनी पेशावरमधील कार्य थांबविले
इस्लामाबाद, ११ जून/ पी.टी.आय.

येथील ‘पर्ल कॉन्टिनेन्टल’ या हॉटेलमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटामुळे संयुक्त राष्ट्रांनी पेशावरमध्ये कार्य करीत असलेल्या आपल्या कार्यालयांचे कार्य तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपली कामे थांबविली असून आपल्या कर्मचाऱ्यांना मायदेशी हलविण्यास सुरुवात केली आहे. ‘पर्ल कॉन्टिनेन्टल’ हॉटेलमध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात तीन परदेशी नागरिकांसह १७ ठार झाले होते.