Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

व्यापार - उद्योग

मंदीतही भारतात सर्वाधिक रोजगारसंधी
३४ देशांमध्ये पार पडलेल्या ‘मॅनपॉवर आऊटलुक’चा सर्वेक्षणाचा निष्कर्ष

व्यापार प्रतिनिधी:
जगभरात आलेल्या मंदीचा परिणाम भारतातील रोजगार संधींवर सर्वात कमी झाला असल्याचे ‘मॅनपॉवर आउटलुक’च्या पाहणीत आढळून आले आहे. सर्वेक्षणात भारतातील ५००० कंपन्यांची मते घेण्यात आली. त्यानुसार भारतातील रोजगारसंधी चांगल्या असल्याचे आढळून आले; परंतु तिसऱ्या तिमाहीत नवीन नेमणुका करताना विशेष सावधानता बाळगण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. भारतातील नवीन रोजगाराच्या संधींचे प्रमाण १९ टक्के असणार आहे. या तिमाहीतील सर्वेक्षणात भारताने ३४ देशांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३४ देशांपैकी फक्त ११ देशांनी तिसऱ्या तिमाहीतील रोजगाराबाबत सकारात्मक स्थितीचे संकेत दिले आहेत.

पुनर्विकास क्षेत्रात विस्ताराचे ‘नीव ग्रुप’चे धोरण
व्यापार प्रतिनिधी:
मुंबईस्थित रियल इस्टेट आणि पायाभूत सुविधा कंपनी निव ग्रुपने पुनर्विकास प्रकल्प हे समूहासाठी त्यांच्या रियल इस्टेट वृद्धी धोरणातीलच एक एकात्मिक घटक असल्याचे स्पष्ट केले आहे. आपला रियल इस्टेट विकास व्यवसाय ग्राहकांच्या गरजा आणि बाजारपेठेतील मागणी यांनुसार ग्राहकाभिमुख करीत समूह आपले वेगळे असे स्थान निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबईतील मोडकळीस आलेल्या उपकरप्रश्नप्त इमारती या खासगी बांधकाम व्यावसायिकांना पुनर्विकासासाठी देण्याचा निर्णय घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर)मध्ये बदल करून ३३ (७) आणि ३३ (९) मध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर दक्षिण आणि मध्य मुंबईतील तब्बल १६,००० इमारती या पुनर्विकासासाठी सज्ज झाल्या आहेत.

अल्ट्राटेक सीमेंटची राज्यात विस्तार योजना
व्यापार प्रतिनिधी:
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचा घटक असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट या आघाडीच्या सिमेंट कंपनीने पुणे शहरात पाच अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन्स (यूबीएस) दालने सुरू केली आहेत. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी ओ. पी. पुरणमाल्का म्हणाले, ‘महाराष्ट्र हे आमच्यासाठी प्रश्नधान्य असलेले राज्य असून, अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्यूशन्स या संकल्पनेचा आम्ही आता पुणे शहरात विस्तार करीत आहोत. याचबरोबर लवकरच राज्यात आणखी ७१ नवी दालने सुरू करून ही सुविधा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत’. ते म्हणाले, ‘गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील आमची दालने यशस्वी झाली आहेत.या दालनात सिमेंट, रंग, वॉटरप्रुफिंग मिश्रण, व्हाईट सिमेंट, पोलाद, पीव्हीसी पाईप इत्यादी सामान उपलब्ध आहे. याशिवाय मूल्यवर्धित सेवांमध्ये बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी फिरती काँक्रीट चाचणी व्हॅन, वास्तुशास्त्रज्ञांची यादी, कंत्राटदार, वास्तुसल्लागार इत्यादी सेवांचा समावेश आहे.

‘एलीकॉन इंजिनीअरिंग’ला २०० कोटीची कंत्राटे
व्यापार प्रतिनिधी:
मटेरियल्स हँडलिंग्ज, इंडस्ट्रीयल गिअर्स आणि ट्रान्समिशन प्रश्नॅडक्ट्स क्षेत्रातील एलीकॉन इंजिनिअरिंगने या वर्षात विविध क्षेत्रातील रु. २०० कोटींची कंत्राटे मिळविली आहेत. मुंद्रा पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. (रु. १२० कोटी), अदानी पॉवर लि. (रु. २१.९९ कोटी), टेकप्रश्ने सिस्टिम्स लि. (रु. १८.५० कोटी), बीजीआर एनर्जी सिस्टिम्स लि. (रु. १०.२९ कोटी) आणि हमबोल्ट वेडॅग इंडिया प्रश्न. लि. (रु. ६.४३ कोटी) या भारतीय कंपन्यांनी आपल्या विविध प्रकारच्या प्रकल्पांसाठी एलीकॉन इंजिनिअरिंगला कंत्राटे दिली आहेत. त्यांच्या जोडीला इजिप्त येथील इजिप्शियन स्पाँज आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे रु. २१.५४ कोटींचे तर पीटी इंजिनिअरिंग या इंडोनेशियन कंपनीतर्फे रु. २.७३ कोटींचे कंत्राट देखील एलीकॉन इंजिनिअरिंगने मिळविले आहे. आर्थिक वर्ष २००९-१० साठी कंपनीने धोरणात्मक विकास योजना आखल्या आहेत. या वर्षी कंपनीची एकूण २० टक्के वृद्धी होईल अशी अपेक्षा असून कंपनीने रु. ११५० कोटींच्या विक्रीचे उद्दिष्ट ठरविले आहे.