Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आम्हाला थोडा उशीर झाला खरं!
श्वेता देसाई/स्वाती खेर
मुंबई, १२ जून

 

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या सल्लागार संपादक सबिना सैगल सैकिया यांचेही प्राण वाचविता आले असते. हे सर्व जण सहाव्या मजल्यावर अडकले होते. कांग यांनी अग्निशमन दलाला आपल्या कुटुंबाला वाचविण्याची कळकळीची विनंती केली; परंतु त्या वेळी सहाव्या मजल्यावरील आगीने रौद्ररूप धारण केले होते- इतके, की अग्निशमन दलाला आत शिरणेही अशक्य होऊन बसले होते. अग्निशमन दलाच्याच एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. तो पुढे म्हणाला- ‘‘आम्ही जेव्हा आग विझवून खोल्यांमध्ये गेलो, तेव्हा फार उशीर झाला होता. खोल्यांमधील लोक होरपळून मृत्यू पावले होते.’’
‘ओबेरॉय- ट्रायडण्ट’ हॉटेलमध्ये आग लागली तेव्हाही पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या नाहीत. कारण मुंबईत ‘मध्यवर्ती रुग्णवाहिका सेवा’च नाही. परिणामत: आगीत भाजून जखमी झालेल्यांना इस्पितळात नेण्यासाठी काळ्या-पिवळ्या प्रीमिअर पद्मिनी टॅक्सींचाच आधार घ्यावा लागला. अन्द्रेना रुद्रानी ही अमेरिकन महिला ओबेरॉयमध्ये जेवत असतानाच दहशतवाद्यांनी तेथे केलेल्या गोळीबारात जबर जखमी झाली; तिलाही टॅक्सीतूनच इस्पितळात न्यावे लागले. ‘कॅफे लिओपोल्ड’मध्ये झालेल्या गोळीबारात अनामिका गुप्ता (२८ वर्षे) गंभीर जखमी झाली. सेण्ट जॉर्ज इस्पितळात तिला नेण्यात आले; परंतु ऑपरेशन थिएटरबाहेर मोठी रांग होती. इस्पितळात भूलतज्ज्ञ उपलब्ध नव्हते. त्यामुळे शस्त्रक्रियेला विलंब झाला. तिच्यावरील शस्त्रक्रिया पाच तास चालली होती. इस्पितळात टेटानसची इंजेक्शन्स, कापूस, पट्टी, सलाईन या गोष्टीसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. तेथील डॉक्टरांनी ते मान्य केल्याचे त्या वेळी तेथे उपस्थित असलेले एक बँक कर्मचारी भरत जाधव यांनी सांगितले. इस्पितळाच्या दोन रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका औषधे आणण्यासाठी पाठविण्यात आली होती. ‘सीएसटी’ रेल्वे स्थानकावरील गोळीबारात जखमी वा मृत झालेल्यांना इस्पितळात आणणे सुरूच होते. सेण्ट जॉर्ज इस्पितळात एकच गर्दी झाली होती. एका वेळी जास्तीत जास्त २० मृतदेह ठेवण्याची क्षमता येथे असताना ५० प्रेते तेथे येऊन पडली होती.
त्या वेळी जे. जे. इस्पितळालाही घटनेबद्दल कळविण्यात आले, तेव्हा तेथे डॉक्टरांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारला आणि २० पलंगांचा एक वैद्यकीय सेवा हॉल तयार ठेवला. तेथेही मृतदेह पाठविण्यात आले. (उर्वरित वृत्त )