Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

विधानसभेत बंडोबा, पालिकेत थंडोबा!
मुंबईतील अनधिकृत झोपडपट्टय़ा वाढताहेत..

खास प्रतिनिधी

मुंबईत दररोज येणारे परप्रश्नंतीयांचे लोंढे त्यातून निर्माण होणाऱ्या अनधिकृत झोपडपट्टय़ा तसेच पाणीपुरवठय़ापासून ते मुंबईच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न यावर विधिमंडळात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी कमालीची आक्रमक भूमिका घेत सरकारवर कोरडे आढले. मात्र याच शिवसेना-भाजपची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत मात्र शिवसेना-भाजपाचे नगरसेवक थंडोबा बनून बसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये गेल्या चार वर्षात सुमारे १७ हजार ५०० झोपडय़ा व दुकाने उभी राहिली आहेत.

‘बेस्ट’च्या मासिक पासांचे ‘ऑनबोर्ड’ नूतनीकरण
‘ब्लू-टूथ’ आधारित ‘पॅसेंजर इन्फर्मेशन सेवा’ कार्यान्वित

प्रतिनिधी

‘बेस्ट’च्या बसमध्ये ब्लू-टूथ तंत्रज्ञानावर आधारित ‘पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिम’ बसविण्यात येणार असून, गो मुंबई स्मार्ट कार्डाच्या माध्यमातून प्रवाशांना एकेरी प्रवासाचेही तिकीट काढता येणार आहे. याखेरीज चालत्या बसमध्ये स्मार्ट कार्ड मासिक पासांचे नूतनीकरण आणि त्यावरील रक्कम रिचार्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘बेस्ट’ प्रशासनातर्फे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली.

९०:१० टक्के कोटा विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात अ‍ॅड‘मिशन’
प्रतिनिधी

अकरावीच्या प्रवेशात एसएससीच्या विद्यार्थ्यांना ९० टक्के तर सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना १० टक्के राखीव जागा ठेवण्यावरून शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, या राखीव जागांचे प्रमाण त्या त्या बोर्डातील विद्यार्थीची संख्या लक्षात घेऊन ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थी-पालकांकडून होत असलेला विरोध योग्य नाही असे बोलले जात आहे. मुंबईत सीबीएसई व आयसीएसईच्या शाळांतील २० हजार विद्यार्थी १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

अभिन्यासाचा घोळ
म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास अभिन्यास (लेआऊट) मंजूर झाल्याशिवाय होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गेले अनेक वर्षे म्हाडाच्या वास्तुरचनाकार विभागाकडून अभिन्यासाचा घोळ सुरू आहे. अनेक वसाहतींचे अभिन्यास मंजूरीच्या प्रतीक्षेत आहेत तर काहींचे अभिन्यास अद्यप मंजुरीसाठीही जाऊ शकलेले नाहीत. अतिरिक्त एफएफएसआयचा लाभ घेण्यासाठी महापालिकेकडून अभिन्यास मंजूर होणे महत्त्वाचे असते.

‘वीणा’ज् वर्ल्ड’ ग्रंथमालिकेतील ‘कॅरिबिअन’चे प्रकाशन
प्रतिनिधी

केसरी टूर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रख्यात कायदेतज्ज्ञ
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते ‘वीणा’ज् वर्ल्ड’ या ग्रंथमालिकेतील ‘कॅरिबियन’ या पाचव्या भागाचे अलीकडेच प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी भूषविले. ‘वीणा’ज् वर्ल्ड’ ही ग्रंथमालिका सर्व पर्यटकांना अत्यंत मार्गदर्शक ठरणारी आहे. मराठी माणूस मागे पडतो असा न्यूनगंड बाळगणाऱ्यांना वीणा पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने चोख उत्तर दिले आहे,

बोरिवली स्थानकाचे नूतनीकरण करावे
संजय निरुपम यांची मागणी

प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ मुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांना विशेषत बोरिवलीवासियांना दिलासा देण्यासाठी नवनिर्वाचित खासदार संजय निरुपम पुढे सरसावले आहेत. बोरिवली स्थानकाच्या नूतनीकरणासह, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकरिता इतर काही सुविधांची मागणी करणारे निवेदन निरुपम यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठविले आहे. संजय निरुपम यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये प्रश्नमुख्याने बोरिवलीवासियांच्या समस्यांची दखल घेतली आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी, एमपीएससी परीक्षेला मोठय़ा संख्येने बसावे
- मयेकर, प्रतिनिधी

समाजामध्ये शिक्षणासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या परीक्षेला महाराष्ट्रातील तरूणांनी मोठय़ा संख्येने बसावे यासाठी त्यांना प्रश्नेत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी कार्यरत व्हायला हवे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी केले.

मराठी उद्योजकाचे स्मरण..
मराठी माणसाने उद्योग व्यसायात पडून हातपाय हालवावेत. मराठी माणसाने व्यवसाय करूच नये, असे कोठेही म्हटलेले नाही. या बाण्याने आपल्या अंगातील व्यवसायविषयक गुणांच्या बळावर शहर परिसरातील नात्या-गोत्याच्या, रक्ताच्या नात्याच्या, ओळखीच्या मराठी माणसांना ‘व्यवसायत ये, तुला काय मदत पाहिजे ती घे, पण व्यवसायात दमदारपणे उभा राहा’ असे म्हणत विनासंकोच मदतीचा हात पुढे करणारे डोंबिवलीतील एक सद्गृहस्थ म्हणजे उद्योजक रमेश उर्फ नाना विष्णू दाते. नानांच्या निधनास १३ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण..

‘वृत्तान्त’ इफेक्ट
दत्ताराम लाड मार्गावरील ‘बेस्ट’ सेवा पूर्ववत
प्रतिनिधी

काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरून गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली ४३, ४४, ५०, ५२, ६७ आणि २०० या क्रमांकाच्या बसेसची डाऊन दिशेची वाहतूक ‘बेस्ट’ने बुधवारपासून पूर्ववत केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. सहा महिन्यांपासून या बसेस पर्यायी मार्गाने धावत होत्या. दत्ताराम लाड मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील कामे पूर्ण झाल्यानंतरही ‘बेस्ट’ने त्यांचे मार्ग पूर्ववत केले नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या संदर्भात ‘बसमार्ग पुर्ववत करण्याचा ‘बेस्ट’ला विसर?’ या मथळ्याखालील ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये १० जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्ताची दखल घेऊन ‘बेस्ट’ने त्याच दिवशी दुपारपासून दत्ताराम लाड मार्गावरील सर्व बस सेवा पूर्ववत केली. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून होणारी ससेहोलपाट थांबल्याने, प्रवासीवर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

हबीब तन्वीर आदरांजली सभा
प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, आविष्कार आणि लोकवाङ्मयगृह यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दिवंगत झालेले बुजुर्ग रंगकर्मी हबीब तन्वीर यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार, १५ जून रोजी सायं. ६.३० वा. प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवनमध्ये स्मृतिसभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ज्येष्ठ रंगकर्मी व अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक प्रश्न. वामन केंद्रे, नाटककार शफाअत खान, कवी सतीश काळसेकर, दिग्दर्शक गिरीश पतके हे हबीब तन्वीर यांच्याविषयी बोलतील. तन्वीर यांच्यावर सुधन्वा देशपांडे आणि संजय महर्षी यांनी केलेला ‘गॉंव का नाम थिएटर, मोर नाम हबीब’ हा माहितीपट यावेळी दाखविण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

निवेदिका स्मिता कराडे यांचे निधन
प्रतिनिधी

दहिसरमधील समाजसेविका, कवयित्री आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दहिसर शाखेच्या सहकार्यवाह स्मिता कराडे यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दहिसरमधील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या बहारदार आणि माहितीपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढत असे. जागृती महिला मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्षा तसेच स्वरनिनाद संगीत साधना या संस्थेच्या त्या प्रमुख कार्यकर्त्यां होत्या. त्यांच्या निधनानिमित्त १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दहिसर शाखा सभागृह, समाजकल्याण केंद्र, लोकमान्य टिळक मार्ग, दहिसर (प.) येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.