Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

आनंद सोहळय़ाला मतभेदांचे गालबोट!
कर्नाटकात लोकसभा निवडणुकीतील भाजपचे घवघवीत यश हे देशपातळीवर उठून दिसत असतानाच अलीकडेच म्हणजे १ जूनला राज्यातील सरकार स्थापनेचा पहिला वर्धापनदिन बंगलोरमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रदेश भाजपमधील मतभेदांचे प्रदर्शन झाले, कारण किमान चार महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री या आनंद सोहळय़ाला अनुपस्थित राहिले. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. एखाद्या व्यक्तीला यश मिळू लागले, की त्याचे हितशत्रू राजकारणात नेहमीच वाढत जातात, तसेच मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या बाबतीत घडले आहे.

भडक चित्रपट निर्मितीच्या देशी
आंध्र आणि तामिळनाडू येथील सिनेमा साठ आणि सत्तरच्या दशकात भडक आणि खोटय़ा चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर होता. प्रचंड प्रेक्षकवर्ग, हिंदी नटांप्रमाणे ग्लॅमर असलेले तारे तारका, चित्रपटांचा अफाट धंदा असलेल्या या दोन प्रांतात फिल्म सोसायटी चळवळ रुजणे हेच मुळात अवघड काम होते.आश्चर्य म्हणजे तामिळनाडूत ‘मद्रास फिल्म सोसायटी’ १९५७ मध्ये म्हणजे फेडरेशनची स्थापना होण्याआधी सुरू झाली. ५०/५२ वर्षे उलटली तरी आजही ती चालू आहे. तामिळनाडूतील आद्य फिल्म सोसायटी असूनही मद्रास फिल्म सोसायटीने फिल्म सोसायटी चळवळ सामान्य माणसांपर्यंत नेण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. दुसरी सोसायटी ‘रसना’ १९६४ मध्ये सुरू झाली. परंतु पुढची १० वर्षे फारशा सोसायटय़ा निर्माण झाल्याच नाहीत.

भव्य उड्डाणे आणि क्रॅश लँडिंगही..
एकीकडे जेव्हा सूर्यास्त होत असतो, तेव्हा दुसरीकडे सूर्योदयासोबत उषेचे नवे रंग उमलत असतात. केवळ आपल्या चिमुकल्या भवतालाचाच विचार करताना जागतिक भान नसले की याची जाणीव नसते. विकासाच्या बाबतीत नेमके हेच वारंवार पाहायला मिळते. विकासाकडे पश्चिम क्षितिजावरून पाहणाऱ्याची दृष्टी वेगळी असते आणि उगवत्या नव्या आशांचे धुमारे बघणाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मुंबईलगत नियोजनपूर्वक उभारण्यात आलेल्या नवी मुंबईतील विकास प्रकल्पांच्या बाबतीत नेमके हेच चित्र अधोरेखित होत आहे.