Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

उपवन तलावातील मगरींना स्थलांतरित करण्याचा ‘डाव’
प्रश्नणीमित्रांचा तीव्र विरोध

कल्याण/प्रतिनिधी -
नागरिकांना त्रास होत असल्याचे कारण सांगत राजकीय दबावाचा वापर करून ठाण्याच्या उपवन तलावातील दोन मगरी अन्यत्र स्थलांतरित करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या मगरी कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नयेत, अशी भूमिका शहरातील प्रश्नणीमित्र, निसर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. गेले सुमारे १५ ते २० वषार्पासून उपवन तलावात (डोह) दोन मगरी वास्तव्य करून आहेत. हा डोह खूप खोल असल्याने मगरींना हे आपले निवासस्थान खूप सुरक्षित वाटते. उपवन परिसर यापूर्वी जंगलमय भाग होता, पण वाढत्या नागरीकरणामुळे उपवन तलावाच्या अवतीभवती मोठय़ा प्रमाणात इमारती उभ्या राहून याठिकाणी नागरी वस्ती वाढली आहे.

२५ टक्के वन बीएचके बांधण्याची अट
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे परिसरात घर घेण्याचे मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी यापुढे शहरात गृहनिर्माण प्रकल्प उभारताना २५ टक्के वन बीएचके घरे बांधण्याची अट बिल्डरांना घालण्यात आली असून या अटीचे पालन करणाऱ्यांचेच विकास प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभे राहात आहेत, मात्र बहुतेक बिल्डर टू बीएचके घरांचीच निर्मिती करतात. त्यामुळे सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न अधुरेच राहते. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी आवाक्यात असणारी वन बीएचके घरे निर्माण व्हावीत, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

‘संस्कृत सुभाषिते’ भेट देण्याचा डोंबिवलीतील वृद्धेचा उपक्रम
डोंबिवली/प्रतिनिधी

मुलांमध्ये संस्कृत भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी, या हेतूने सुमित्रा गंगाधर गुर्जर यांनी लिहिलेले ‘सार्थ संस्कृत सुभाषितमाला’ हे पुस्तक राज्यातील मराठी शाळांना पाठविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या सुभाषितमालेची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. परंतु, हे पुस्तक विद्यार्थी, पालकांसह अनेक दर्दी वाचकांना भावल्याने पहिली आवृत्ती हातोहात संपली. अनेक शाळाचालकांकडून सुमित्रा गुर्जर यांच्याकडे या पुस्तकाविषयी विचारणा करण्यात आली.

ध्येय निश्चित असल्यास स्वप्नपूर्ती निश्चित -जिल्हाधिकारी
ठाणे/प्रतिनिधी :
वेगळ्या वाटा चोखाळून त्यात प्रश्नवीण्य मिळविणाऱ्या पहिल्या पिढीच्या चौघा तरुण व्यावसायिकांना जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्या हस्ते ‘व्यास क्रिएशन’च्या वतीने ‘करिअर आयडॉल’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. दुचाकी व चार चाकी वाहनांच्या प्रशिक्षक स्वाती काळे, जाहिरात व मीडिया माध्यमातील अमोल धर्मे, सॉफ्टवेअर प्रश्नेग्राम डेव्हलपर पूजा आठवले आणि आर्किटेक्ट ए. व्ही. देसाई या चौघांना यावेळी पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आणि मेजर सुभाष गावंड उपस्थित होते.

अकरावी ऑनलाइन प्रवेश; मार्गदर्शन शिबिरास उदंड प्रतिसाद
कल्याण/वार्ताहर :
शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे अकरावी ऑनलाइन प्रवेश मार्गदर्शन, दहावी व बारावीनंतर पुढे काय, स्पर्धा परीक्षा व जीवनाची दिशा याविषयी विद्यार्थी, पालक मार्गदर्शन शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या गर्दीमुळे आचार्य अत्रे रंगमंदिराचा मुख्य दरवाजा निखळून पडला, परंतु कोणालाही इजा झाली नाही. महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन प्रवेशाची योजना जाहीर केल्यावर यामध्ये गोंधळ उडेल व सायबर कॅफेचा ५० टक्के पालकवर्ग आधार घेतील.

सारथी मीडिया स्कूलतर्फे प्रश्नयोगिक वर्तमानपत्र
ठाणे/प्रतिनिधी :
सारथी स्कूल ऑफ मीडिया मॅनेजमेंटतर्फे पत्रकारिता, जाहिरात, फोटोग्राफी, सूत्रसंचालन, व्हिडीओ शूटिंग असे प्रसारमाध्यमांशी संलग्न असलेले अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यंदा या अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष असून त्या संदर्भात ठाण्याच्या सरस्वती शाळेमध्ये एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फोटोग्राफीचे विनय पाटील, जाहिरात क्षेत्राचे अमोल धर्मे, पत्रकारिता क्षेत्रातील मकरंद मुळे, सूत्रसंचालन- निवेदन क्षेत्रातील मकरंद जोशी इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सेमिनारमध्ये सारथीच्या पहिल्या वर्षात पत्रकारिता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्नयोगिक तत्त्वावर तयार केलेल्या ‘वेध’ या वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वृत्तपत्र काढताना आलेले अनुभव पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण झालेली सीमा अवसरेने कथन केले. वेध वृत्तपत्रात संतोष फापाळे, प्रज्ञा सोपारकर, गीतांजली शहा, कीर्ती तटकरे, पूर्वा सुद्रिक, सीमा अवसरे, सुनील गवई, पल्लवी सोनावणे या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.

अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे करिअर मार्गदर्शन
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथ शहर शिवसेना शाखेतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १३ जून रोजी वडवली येथील रोटरी सभागृहात सायंकाळी ६ वा. होणाऱ्या शिबिरात करिअरच्या विविध वाटांसंदर्भात करिअरतज्ज्ञ किरण जोग मार्गदर्शन करणार आहेत. खासदार आनंद परांजपे, जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, नगराध्यक्षा संपदा गडकरी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे आयोजक शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता करिअर व्हिजन मार्गदर्शन
ठाणे/ प्रतिनिधी:
इंजिनिअरिंगच्या एकूण ७० शाखांपैकी नेमकी कुठली शाखा निवडावी, प्रश्नधान्य शाखेला द्यायचे की महाविद्यालयाला, ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरावा, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी आणि पालकांना हवी असतात. शनिवार-रविवार ठाण्यात आयोजित लोकसत्ता करिअर व्हिजन मार्गदर्शन मेळाव्यात अशा प्रकारच्या अनेक शंकांचे निरसन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन विनामूल्य असून जास्तीत जास्त तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पॅरामेडिकल क्षेत्रातील संधी आज मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. विशेषत परदेशात अशा व्यक्तींना विशेष मागणी आहे. वाणिज्य शाखेतही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कांती विसारिया सभागृह, गावदेवी, नौपाडा, ठाणे (प) येथे शनिवार-रविवारी (१३-१४ जून) येथे दोन्ही दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ७ यावेळेत करिअर व्हिजन मेळावा भरत असून प्रवेश विनामूल्य आहे. परिसंवादाच्या नावनोंदणीसाठी व अन्य माहितीसाठी करिअर फाउंडेशनच्या ०२२-३२५०८४८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑटोरिक्षा परवाना नूतनीकरणाला वाढीव मुदत
ठाणे/प्रतिनिधी -

ऑटोरिक्षा परवाना नूतनीकरणाच्या कालावधीत आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली असून प्रति महिना ५० रुपये दंड आकारून रिक्षाचालकांना ३१ ऑगस्टपर्यंत परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे.

स्वत:ला ओळखण्याचे शास्त्र!
ठाणे/प्रतिनिधी

आपण स्वत:ला किती ओळखतो, हे आजच्या स्पर्धात्मक युगात एखाद्याला पटवून देणे कठीण झाले आहे. कारण प्रत्येक निर्णय घेताना आपण स्वत:ची कुवत, आवड व इच्छा यांची सांगड घालतो, परंतु प्रश्न करिअरचा असो वा कौटुंबिक, तो सोडविण्यासाठी प्रत्येकाने आधी स्वत:ला आणि भोवतालच्या व्यक्तींना ओळखणे गरजेचे असते. त्यासाठी ट्रान्सेंशनल अॅनालिसीस (टीए) हे शास्त्र आपल्याला स्वत:बरोबर इतर व्यक्तींच्या स्वभावाची ओळख करून देण्यास मदत करते.
या शास्त्रामुळे आपण एखाद्या व्यक्तीच्या व्यावहारिक, व्यावसायिक अथवा कौटुंबिक कोणत्याही वर्तणुकीबाबत अंदाज करू शकतो. या शास्त्राद्वारे आपल्या स्वभावातील प्रत्येक पैलूंचे, गुण-दोषांचे, आवड-निवडींचे, वेगवेगळ्या प्रसंगातील आपल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केले जाते. तज्ज्ञ व्यक्तींकडून हे शास्त्र शिकून घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ठाण्याच्या अग्रगण्य एच. आर. कन्सल्टन्सीतर्फे दर महिन्याला ठाण्यामध्येच एका कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या शास्त्रात पारंगत असलेले प्रशिक्षक उदय वैद्य यांनी गेली १६ वर्षे जॉन्सन अॅन्ड जॉन्सन, ग्लॅक्सो, ब्लू स्टार, कॅडबरीज या आणि अशा अनेक नामवंत कंपन्यांमधील सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना याविषयी प्रशिक्षण दिले आहे. येत्या रविवारी १४ जून रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० या वेळेत ठाण्यातील हॉटेल वुडलँड रिट्रीट येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी होण्यासाठी संपर्क करा. सीमा बिवलकर- ९७०२०१३०२५/ २५३९९३१९.