Leading International Marathi News Daily

शनिवार, १३ जून २००९

अमरावती विभागातील जलसाठय़ांची स्थिती चिंताजनक
३४६ प्रकल्पांमध्ये १० टक्केच साठा
काटेपूर्णा धरण कोरडे
अमरावती, १२ जून / प्रतिनिधी

पावसाचे आगमन लांबत चालले असताना अमरावती विभागातील जलसाठय़ांची स्थिती चिंताजनक बनत चालली असून विभागातील ८ मोठय़ा सिंचन प्रकल्पांसह मध्यम आणि लघु अशा ३४६ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये तर ६ टक्क्याहून कमी पाणीसाठा आहे. अमरावती विभागात २००३ नंतर अशी स्थिती प्रथमच उद्भवली आहे.

चंद्रपुरात कृषी केंद्रांवर छापे!
चंद्रपूर, १२ जून/ प्रतिनिधी

जिल्ह्य़ात बियाणे कंपन्यांकडून निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी छापे टाकण्याचे सत्रच सुरू केले आहे. जिल्ह्य़ात पावसाला सुरुवात होताच कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी खते व बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे.पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाल्याने शेतीच्या कामाला आता जोर चढला आहे.

गैरव्यवहाराच्या चौकशीच्या घोषणेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
कोल्हापुरी बंधारे प्रकरण

अकोला, १२ जून /प्रतिनिधी

कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या कृषीमंत्र्यांच्या घोषणेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उच्चस्तरीय चौकशीत कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामातील अन्य घोळही उजेडात येण्याची शक्यता असल्यामुळे अकोला जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्य़ातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामात तीन कोटीहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ खगोलशास्त्र केंद्राचे आज उद्घाटन
अमरावती, १२ जून / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात खगोलशास्त्र केंद्राची स्थापना करण्यात येत असून या केंद्राचे उद्घाटन उद्या १३ जूनला बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे डॉ. जगदेव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी खग्रास सूर्यग्रहणावर दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुणे येथील ‘आयुका’ या संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठाच्या गणित विभागात हे खगोलशास्त्र केंद्र स्थापन करण्यात येत आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांना अंतराळाचे निरीक्षण आणि अंतराळविषयक संशोधन करता यावे, हा या केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.

मूलभूत सोयींकडे लक्ष देणारा लोकप्रतिनिधी
चंद्रशेखर श्रीखंडे

परिसीमनांतर्गत मतदारसंघ फेररचनेनुसार कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ संपुष्टात येणार आहे. कायम अस्तित्व गमावणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा वैशिष्टय़पूर्ण विकास कामांमुळे चेहरामोहरा बदललेला दिसून येतो. १९९५ पासून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रमेश बंग करीत आहेत. सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांनी संधी दिल्यामुळे अपक्ष म्हणून १९९५ ची निवडणूक, १९९९ व २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर रमेश बंग यांना जनतेने संधी दिली.

वर्धेत महादेवराव भुईभार यांचे कृषी कीर्तन
वर्धा, १२ जून / प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी त्यांच्या समृद्धीसाठी माती, पाणी व पैसा अडवावा. पुढाऱ्यांच्या शब्दाला भुलून पैशाचा अपव्यय टाळावा, असा सल्ला ज्येष्ठ सत्यशोधक महादेवराव भुईभार यांनी त्यांच्या ‘कृषी कीर्तन’ कार्यक्रमातून दिला. भैयाजी रहाटे स्मृतिदिनानिमित्त या प्रबोधनपर कृषी कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन तासाच्या ओघवत्या वाणीतील प्रबोधनाने भुईभार यांनी शेतकऱ्यांच्या विदारक स्मृतीचे चित्र व त्यावरील उपायावर मार्मिक भाष्य केले. ‘जाहिरातींना भुलू नका, पाणी अडवा, जमिनीची धूप थांबवा, पैशाचा अपव्यय टाळा, आत्महत्येची वृत्ती सोडून द्या’ असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास भूविकास बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब साळवे, माजी नगराध्यक्ष सुनीता ईथापे, भाऊसाहेब थुटे, स्मृती समितीचे जनार्दन ठाकरे, चित्रा रहाटे, नाटय़कर्मी हरीश ईथापे, कवी संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते. प्रश्नरंभी मोहन राईकवार यांनी प्रबोधनगीत सादर केले. सुरेश रहाटे यांनी प्रश्नस्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. माजी सरपंच दीपचंद काळे यांनी उपक्रमाचे स्वागत केले. संचालन ऐश्वर्या रहाटे हिने केले.

ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबची मानवी साखळी
भंडारा, १२ जून / वार्ताहर

मानवाच्या सामूहिक प्रयत्नाशिवाय पर्यावरण संरक्षण कुचकामाचे ठरते, असे विचार जिल्ह्य़ाचे उपवनसंरक्षक यशबीरसिंग यांनी लाखनी येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. हा कार्यक्रम वनविभाग , ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्यावतीने लाखनी येथे समर्थनगर मैदानावर झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रश्नचार्य सूर्यकांत गोरले, दादासाहेब राजहंस, यादवराव कापगते, मानद वन्यजीव संरक्षक अॅड. संजीव गजभिये, दौलत लांजेवार, निवृत्त वनाधिकारी रामदास सार्वे, रामटेके, दिनेश गुप्ता उपस्थित होते. याप्रसंगी वटवृक्षाला प्रतिकात्मक मानवी साखळीने फेर घालून १० कलमी पर्यावरण शपथ घेण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. प्रश्नस्ताविक ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे संघटक प्रश्न. अशोक गायधने यांनी केले. पर्यावरणविषयक समूहगीत, ग्रीन फ्रेन्ड्स नेचर क्लबच्या सदस्य शिवाजी इंगोले, चारू निखाडे, सोनाली पिंपळशेंडे, कल्याणी गायधनी यांनी गायले. वटपौर्णिमेला वडाचे पूजन करून पर्यावरण संस्कृती कशी जोपसली गेली, याचीही माहिती देण्यात आली. संचालन लाखनी वनक्षेत्राचे वनाधिकारी नरेशचंद्र कावळे यांनी केले. आभार प्रश्न. भास्कर गिऱ्हेपुंजे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय लाखनी वनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आर.एस. दोनोडे यांनी करून दिला.

वर्षा उसगावकरांच्या कार्यक्रमावर रसिक मुग्ध!
अंजनगावसुर्जी, १२ जून / वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तालुक्यातील निराधार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्षा उसगावकर नाईट’ कार्यक्रमास अंजनगावसुर्जीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कविटकर मंगल कार्यालयात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात उशिरा झाली असताही रसिकश्रोत्यांचा उत्साह मात्र मध्यरात्रीपर्यंत कायम होता. अभिनेत्री उसगावकरांनी सादर केलेल्या मराठी-हिंदी गीतांसह लावणीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मनसेने दत्तक घेतलेल्या निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. कमलकांत लोडोळे, माजी सभापती प्रश्न. जगनराव हरणे, जिल्हा परिषद सदस्य विलास पवार, प्रश्नचार्य आर.डी. सिकची उपस्थित होते. प्रश्नस्ताविक मनसेचे जिल्हा प्रमुख प्रदीप येवल यांनी केले, तर आभार विजय जोंधळेकर यांनी मानले.