Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन
नगर, १३ जून/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत यंदा प्रथमच प्रश्नथमिक शिक्षकांच्या (उपाध्यापक) ऑनलाईनच्या पारदर्शक पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने यांनी राबविलेल्या या

 

धोरणाबद्दल शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेत सवार्त मोठा संवर्ग प्रश्नथमिक शिक्षकांचा आहे. सुमारे ११ हजारांहून अधिक शिक्षक आहेत. शिक्षकांच्या बदल्या दर वर्षी चर्चेचा विषय होत असतो. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप, सदस्यांचा दबाव यातून शिक्षकांचा बदल्या मेमो रेंगाळतही असतो. तसेच गैरप्रकाराची चर्चा जि. प. वर्तुळात रंगत असते. याला छेद देण्याचे काम यंदा माने यांनी केले. जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी या धोरणास पाठिंबा दिला. पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोंडिराम नागरगोजे यांनी काही महिन्यांपूर्वी पदोन्नतीने नियुक्तया देताना ऑनलाईन पद्धतीचा वापर केला. आता माने यांनी त्यापुढे पाऊल टाकत सेवाज्येष्ठतेचा निकष लावत ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या. त्यामुळे बदल्यांत बाह्य़ हस्तक्षेपास संधी राहिली नाही.
एक ऑक्टोबरची वास्तव्य सेवाज्येष्ठता अर्हता मानून बदलीपात्र शिक्षकांची संख्या २६९ होऊ शकत होती. त्यासाठी ४५७जणांनी अर्ज केले होते. त्यातील पती-पत्नी एकत्रिकरणाच्या ७५ बदल्या होत्या. यंदा प्रशासकीय बदल्यांना मनाई करीत राज्य सरकारने केवळ विनंती बदल्यांना मान्यता दिली. याचे समाधान शिक्षकांत असताना एका तालुक्यात नोकरी केल्यानंतर पुन्हा तेथे बदली करण्यास मनाई या सरकारच्या अटीमुळे शिक्षक त्रस्तही होते.
नियमानुसार प्रथम नियुक्तीस पती-पत्नी एकत्रिकरणास प्रश्नधान्य देण्यात आले. (कै.) अण्णासाहेब शिंदे सभागृहात मोठय़ा पडद्यावर रिक्त जागांचा तपशील दाखवून, सर्वासमक्ष ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना बोलावून, उपलब्ध जागांपैकी कोठे नियुक्ती हवी, याची विचारणा करून नियुक्ती दिली जात होती.
या वेळी श्री. माने, शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे व इतर अधिकारी उपस्थित होते. नगर, पारनेर या तालुक्यांना शिक्षकांची सर्वाधिक पसंती होती. परंतु तेथे रिक्त जागा मर्यादित होत्या. त्यामुळे उर्वरित शिक्षकांनी बदली नाकारली.अकोले तालुक्यातून बाहेर बदली मागणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त होऊ लागल्याने सुमारे ६० शिक्षकांनी बाहेर अन्यत्र बदली मागितली. यातून निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन या तालुक्यातील बदल्या थांबविण्यात आल्या. आता बदली करावी व नवीन शिक्षकाची नियुक्ती झाल्यावर हजर होण्यासाठी कार्यमुक्त करावे, अशी मागणी या शिक्षकांनी केली.