Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

राम-लक्ष्मणाने केली भाजप व काँग्रेसची कोंडी!
नगराध्यक्ष निवड
पाथर्डी, १३ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीराम सुद्रुक व राम बंग, तर काँग्रेसकडून लक्ष्मण हंडाळ इच्छुक आहेत. परंतु उमेदवार दुसरेच असल्याने भाजपला दोघा रामांनी, तर काँग्रेसला लक्ष्मणाने कोंडीत पकडले आहे. राम-लक्ष्मणाची आडकाठी दोन्ही पक्षाचे नेते कशी दूर करतात, याकडे कार्यकर्त्यांचे

 

लक्ष लागले आहे.
पालिकेत भाजप ६, काँग्रेस ६, रामगिरबाबा आघाडी ३, तर राष्ट्रवादी २ असे बलाबल आहे. अडीच वषार्ंपूर्वी भाजपच्या रंजना गर्जे बिनविरोध निवडून आल्या. त्या वेळी पडद्याआड झालेला काँग्रेस-भाजपमधील तह आता मोडीत निघाल्याने या वेळी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे मात्र निश्चित. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आघाडी व राष्ट्रवादीच्या पाचही नगरसेवकांचे महत्त्व वाढले आहे. आघाडीने भाजपला, तर राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ देण्याचे ठरविले असल्याने सध्या भाजप आघाडीचे नऊ, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आठ असे संख्याबळ कागदोपत्री दिसते. मात्र, भाजप आघाडीतील सुद्रुक व बंग या दोघांनीही नगराध्यक्षपदावर दावा केल्याने भाजपला पालिकेत रामाचा अडसर आला आहे. या दोघांचीही मनधरणी आघाडीकडून चालू आहे. दुसरीकडे हंडाळ यांनीही अध्यक्षपदावर दावा सांगितल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अडचणीत आली आहे.
भाजप आघाडीने दिनकर पालवे यांची, तर काँग्रेस आघाडीने बंडू बोरुडे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सांगण्यात आले.