Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निवडणुकीच्या रिंगणात १३ संचालक आणि १४ सभासद
नेवासे तालुका पतसंस्था फेडरेशन
नेवासे, १३ जून/वार्ताहर

नेवासे तालुका पतसंस्था फेडरेशनची निवडणूक दि. १४ जुलैला होत असून, या निवडणुकीत संचालक १३ आणि सभासद १४च आहेत. त्यामुळे उरलेला एक सदस्य हा तज्ज्ञ की स्वीकृत

 

असा प्रश्न आहे.
तालुक्यात ४३ ग्रामीण बिगरशेती, तर ११ पगारदार सेवकांच्या पतसंस्था आहेत. एकूण ५५ पतसंस्था असतानाही फेडरेशनची सभासद संस्था मात्र केवळ १५ आहेत. मतदानासाठी दोन वर्ष जुना सभासद हवा, हा नियम असल्याने या वेळच्या निवडणुकीसाठी १४५ पतसंस्था सभासद मतदार म्हणून पात्र आहेत. सध्या या फेडरेशनच्या अध्यक्षपदी आमदार यशवंतराव गडाख, तर उपाध्यक्षपदी प्रश्न. के. बी. काळे आहेत.
पतसंस्थांची अंतर्गत तपासणी व मार्गदर्शन करण्याचे काम फेडरेशन करते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. सध्या पतसंस्थांची परिस्थिती बिकट आहे. पतसंस्थांचे एक सरकारी ऑडिट होतच असते. त्यामुळे पतसंस्थांना फेडरेशनच्या ऑडिटची गरज वाटत नाही. शिवाय ऑडिट फी वाचत असल्याने या पतसंस्था फेडरेशनचे सभासद होणे टाळतात.
फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांच्या इतर अडचणीही सोडवता येतात. त्यामुळे तालुक्यातील सर्व पतसंस्थांनी फेडरेशनचे सभासद व्हावे, असे आवाहन करण्यात येत असते.