Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढविणार - इथापे
संगमनेर, १३ जून/वार्ताहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नगर जिल्ह्य़ातील विधानसभा निवडणूक स्वबळावर आणि पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) डॉ. अरुण इथापे यांनी

 

दिली.
ते म्हणाले की, गत तीन वर्षापासून गाव तेथे पक्षाची शाखा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर, राहुरी, अकोले आदी तालुक्यांतील गावागावात मनसे शाखांची बांधणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या तीन विधानसभा मतदारसंघांत मनसेचे दोन लाखांहून अधिक सभासद आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यात व्यस्त होते. मात्र, कोणाच्याही व्यासपीठावर गेले नाहीत. इतर पक्षांच्या तुलनेत राहुरी तालुक्यात मनसेच्या सर्वाधिक शाखा आहेत. अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातही मनसे पोहोचली आहे.
स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिका पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आम्ही मांडणार आहोत. दुसऱ्या पक्षातून बंडखोरी करीत ऐनवेळी पक्षबदल करणाऱ्यांना पक्षात थारा, उमेदवारी न देण्याची श्री. ठाकरे यांची भूमिका आहे. मनसे जिल्ह्य़ात खाते उघडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही डॉ. इथापे यांनी व्यक्त केला.