Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

महापालिका सज्ज
शेखर जोशी

मान्सून अद्याप मुंबई आणि परिसरात दाखल झाला नसला तरी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थीतीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. अतिवृष्टी झाली तर करावयाच्या उपाययोजनांबरोबरच सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्यासाठीही पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या बंदिस्त व उघडय़ा गटारांतून आणि नाल्यांतून गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मिठी, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांमधील गाळ काढण्यात आला आहे.

अप्पा पुंडलिक
History repeats again & again आणि म्हणूनच जुलै महिना आला रे आला की मुंबईकरांच्या आठवणी ताज्या होतात. त्यांच्या डोळ्यासमोर दिसतो २६ जुलैला झालेला महापाऊस. पाण्याखाली गेलेली मुंबई. जीव मुठीत धरून जिथे आसरा मिळेल तिथे दबून राहिलेली माणसे आणि पाण्याने केलेले भयंकर नुकसान. असे परत झाले तर? या ‘तर’लाच हे उत्तर आहे. सर्वप्रथम आपण २६ जुलै २००५ ला ग्रहांची काय परिस्थिती होती त्याचा अभ्यास करू या.

कैलास कोरडे
मुंबई महानगर पालिकेसह सर्वच शासकीय संस्था दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून पावसाळ्याची जय्यत पूर्व तयारी करतात. पण अनेकदा पहिलाच पाऊस त्यांच्या सर्व दाव्यांवर पाणी फिरवतो. त्यांच्या सुसज्जतेच्या दाव्यांचा फज्जा उडण्याचा अनुभव मुंबईकरांना काही नवा नाही. त्यामध्ये मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी उपनगरी रेल्वे सेवाही आली. पावसाळ्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज असल्याचा दावा दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य व पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे.

विकास महाडिक
जगाची निर्मिती करताना देवांनी आपलीही कामे वाटून घेतली होती असे म्हणतात. त्यात निर्मितीचे काम ब्रह्म देवाकडे तर पालनकर्ता म्हणून विष्णू आणि संहारक म्हणून महेश अर्थात शंकराकडे काम सोपविण्यात आले. अशीच कहीशी विभागणी मुंबई नावाच्या शहराची राज्यकर्त्यांनी केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबईला ‘वर्ल्ड क्लास’ बनविण्यासाठी मुंबई महानगर विकास प्रश्नधिकरण सध्या मोठय़ा हिरिरीने मैदानात उतरली आहे.

‘सापडलेल्या आठवणी’ नात्याचं नकोसं खोदकाम
मानवी नातेसंबंध हा सृजनशील लेखक-कलावंतांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. प्रख्यात कन्नड नाटककार गिरीश कर्नाड यांनाही त्यानं भूल घातली नसती तरच नवल! आजवर बहुतेक मिथकं आणि लोककथांवर आधारित नाटकं लिहिणाऱ्या कर्नाडांनी आता थेट वास्तवात यायचं ठरवलेलं दिसतंय. त्यांचं अलीकडचं ‘ब्रोकन इमेजेस’ हे इंग्रजी नाटक काय, किंवा आत्ताचं ‘वेडिंग अल्बम’ काय, ही त्याचीच उदाहरणं म्हणता येतील.

दृष्टीसाठी कार्यरत एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिटय़ूट
संगणकावर दररोज ८ ते १० तास काम करणाऱ्या बहुतेकांना डोळ्याचे विकार सतावतात. अलीकडे जीवनशैलीमुळे हे प्रमाण वाढू लागले आहे. मोतीबिंदूनंतर अनेक रुग्णांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागतो. मधुमेहींना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर डोळ्याची आग होऊन पाणी येत राहते. या सर्व विकारांमुळे दृष्टिक्षमता कमी होते. बऱ्याच रुग्णांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर कॅर्नियाला सूज येते.ज्यामुळे कॅर्नियाच्या अंतस्तरीय (Endothelial) पेशींचे प्रमाण कमी होते. डोळ्याच्या पुढच्या भागात द्रावण असते.

‘स्टार्टर्स’ हेच (बेचव) जेवण!
हल्ली हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मेनुकार्ड समोर येतं, तेव्हा त्यात ‘स्टार्टर्स आणि ‘मेन कोर्स’ असे दोन विभाग असतात. म्हणजे जेवणापूर्वी क्षुधाग्नी प्रज्वलित करण्यासाठी ‘स्टार्टर’ नामक पदार्थ असतात. प्रत्यक्षात अनेकदा हे ‘स्टार्टर’ आपली भूक मारून टाकतात आणि माणसे भाताचे किंवा ‘दाल-खिचडीचे’ चार घास खाऊन उठतात. ‘कल किसने देखा’ हा नवा चित्रपट असाच आहे. ‘मेन कोर्स’ आता सुरू होईल या अपेक्षेने आपण अनिच्छेने ‘स्टार्टर्स’ पाहत राहतो आणि चित्रपट संपता संपता लक्षात येते की, यालाच दिग्दर्शकाने ‘मेन कोर्स’ म्हणून आपल्या थाळीत घातले होते!

विषय तसा चांगला..
विषय चांगला असेल तर ‘तासा’ला बसण्याआधीपासूनच उत्सुकता असते. पण मास्तरांची शिकवण्याची पद्धत त्या विषयाला साजेशी नसेल तर आवडत्या विषयाचा ‘तास’ही संपता संपत नाही. ‘पिंजरा’तील मास्तरांनी भावनेला हात घातला, ‘एक डाव भुताचा’मधल्या ‘मास्तुरे’ने पोट दुखेस्तोवर हसवले, ‘मास्तर एके मास्तर’मधल्या मास्तरने ना हसवले, ना डोळ्यात पाणी आणले. त्याने केवळ आपला ‘तास’ घेतला इतकेच!
बाप्पा मोरे (अशोक सराफ) हा शाळेतील साधा शिक्षक आहे. पेशाने शिक्षक असला तरी मटका, दारू त्याला वज्र्य नाही. पैशाचा लोभी असलेला बाप्पा मोरे एका साध्या शिक्षकापासून शिक्षकसम्राट होतो त्याची ही गोष्ट आहे. शिक्षकापासून शिक्षकसम्राट होईपर्यंत तो कायद्याला कसा वाकवतो हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. कथासार सागंण्यास सोपे असले तरी प्रभावीपणे पडद्यावर दाखविणे तसे कठीण झाले आहे. बाप्पा मोरे इतक्या सहजपणे एकेक पायरी वर चढतो की, हा त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे, असे वाटते. त्याला कुठेही फार त्रास होत नाही किंवा त्याला फार शक्कल लढवावी लागत नाही. चित्रपटभर त्याचे कौशल्य दिसणे अपेक्षित होते. पण बाप्पा मोरेला फारसे डावपेच आखावेच लागत नाहीत. त्याचा शिक्षकसम्राट पदापर्यंतचा मार्ग अत्यंत सरळ आहे. एखाद्याने इमारतीच्या पायऱ्या चढाव्यात तितक्याच सहजपणे बाप्पा मोरे या ‘प्रगती’च्या पायऱ्या चढतो. शिक्षकी पेशातील माणूस इतका खुले आम दारूच्या गुत्त्यावर किंवा मटका लावायला जाईल यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. या चित्रपटातील ‘विमल मोरे’ ही व्यक्तिरेखा सोडली तर बाकीच्या सर्वानाच दिग्दर्शकाने ओव्हरअॅक्टिंग करायला लावली आहे. केवळ अशोक सराफ पडद्यावर दिसतात म्हणून प्रेक्षक हसतील, असे घडत नाही. त्यासाठी खुसखुशीत संवाद, चटपटीत प्रसंग यांचीही जोड असावी लागते. या चित्रपटात सुरुवातीपासूनच त्याची कमतरता भासते. ‘हम पाँच’मधील ‘आनंद माथूर’ शैलीतील विनोद आता तितकेसे हसवत नाहीत. बऱ्याच वर्षापूर्वी अमोल पालेकर आणि स्वरूप संपत यांच्या भूमिका असलेल्या ‘नरम गरम’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या कथाभागाची उजळणी या चित्रपटातही केली आहे. त्यातच दोन आयटम नंबर टाकून दिग्दर्शकाने ‘हा एक पठडीतला चित्रपट आहे’, असे ठासून सांगितले आहे. एकूणातच या मास्तरांचा तास फारसा रंगलेला नाही.
सुनील डिंगणकर
मास्तर एके मास्तर
निर्माता - मेघराज राजेभोसले
दिग्दर्शक - संजय सूरकर
कथा-संवाद - प्रमोद जोशी
पटकथा - प्रमोद जोशी, संजय सूरकर
संगीत - हर्षित अभिराज
कलाकार - अशोक सराफ, सुरेखा कुडची, दीपाली सय्यद, मंगेश देसाई, विजू खोटे, किशोर प्रधान इत्यादी