Leading International Marathi News Daily

रविवार, १४ जून २००९

भाजे : महाराष्ट्रातील आद्य लेणे
रामदास खरे

‘केशवसुत’. आधुनिक मराठी कवितेचे जनक. अर्वाचीन मराठी कवी मंडळींमधील एक वादग्रस्त कवी. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी ‘तुतारी’ ही कविता लिहिली. समाजाला जागे करणारे, धक्का देणारे वाद्य म्हणजे तुतारी. या कवितेतील पुढील काव्यपंक्ती आजच्या तरुणाईला विशेष करून दुर्गभ्रमंती, भटकंतीची आवड जोपासणाऱ्या सर्वासाठी उद्बोधक!
प्रश्नप्तकाल हा विशालं भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
कवितेचा अर्थ सोपा आहे. संधी अमर्याद आहे, आपले कर्तृत्व दाखवा, आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवा. फुकट वेळ दवडवू नका, विक्रम करा. हा कणखर सह्याद्री, हा उत्तुंग हिमालय आपलीच वाट पाहतोय मित्रा. सत्वर कर.

अग्यार समितीचे कामकाज सुरू असतानाही
कल्याण- डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांना उधाण

कल्याण/प्रतिनिधी-
६७ हजार अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिकेत अग्यार समितीचे चौकशीचे काम सुरू असतानाच अधिकारी, नगरसेवकांच्या आशीर्वादाने शहरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. पालिकेतून बाहेर पडण्याचे वेध लागलेल्या आयुक्त गोविंद राठोड यांचा प्रशासनावर अजिबात वचक राहिला नसल्याचे चित्र यामुळे पालिकेत दिसून येत आहे. दरम्यान, माजी आयुक्त आर. डी. शिंदे यांच्या कार्यकाळात पालिका हद्दीत १६९१ अनधिकृत बांधकामे झाली होती.

दहावीनंतर अकरावी आणि टेलिकॉम डिप्लोमा दोन्ही?
सध्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाचा विषय जोरदार चर्चेत आहे. अकरावी शास्त्र शाखेचा अभ्यास चालू ठेवून टेलिकॉम डिप्लोमाचा अभ्यास करणेही शक्य केले आहे, इन्स्टिटय़ूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आयईटीई) या संस्थेने. आयईटीई या संस्थेने डिप् आयईटीई हा कोर्स सुमारे २० वर्षापूर्वी सुरू केला. त्याच्या दोन शाखा आहेत. (१) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ईटी) आणि (२) कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग (सीएस).

थोरल्या गोव्यातील जगप्रसिद्ध चर्च!
सदाशिव टेटविलकर

गाडीने मांडवी नदीवरील पूल ओलांडला आणि गोव्याची राजधानी पणजीकडे न जाता डाव्या बाजूने प्रियोळच्या श्री मंगेशी मंदिराच्या दिशेने गाडी धावू लागली. काही वेळातच जुने गोवे (याला स्थानिक लोक थोरले गोवे म्हणतात.) म्हणजे थोरल्या गोव्यातील ऐतिहासिक व अतिशय महत्त्वाच्या अशा दोन चर्चच्या मधल्या रस्त्यावर येऊन गाडी थांबली. या दोन चर्चपैकी एक गोव्यातील सर्वात जुने आणि अर्थात पहिले चर्च असून, त्याचे नाव ‘सेंट कॅथ्रेडल चर्च’ असे आहे. आणि दुसरे आहे जागतिक हेरिटेज्मध्ये गणले जाणारे ‘बॉम जीजस् चर्च’, हे दोन्ही चर्च पाहायला जगभरातील हजारो माणसे रोज येत असतात. १९३० त्या सुमारास गोमंतकात १०१ चर्च असल्याची नोंद मिळते.

न्यायासाठी जागरूक ग्राहकांची आवश्यकता
श्रीराम पुरोहित

जाहिरातींच्या माध्यमातून विविध कंपन्या आपली उत्पादने अथवा अनेक प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचा मोठय़ा खुबीने प्रयत्न करीत असतात. त्यासाठी या उत्पादकांकडून अथवा एखादी विशिष्ट सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांकडून मोठमोठे दावे करण्यात येत असतात. त्याला भुलून ग्राहक या वस्तू अथवा सेवा खरेदी करतो. तथापि, त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा या सेवेचा लाभ मिळावा, अशी संबंधित ग्राहकाची अपेक्षा असते; तेव्हा मात्र विविध प्रकारच्या सबबी पुढे करून त्या लाभापासून ग्राहकांना वंचित ठेवण्यासाठीच संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील मेडिक्लेमच्या एका ग्राहकाला दुर्दैवी अनुभव घ्यावा लागला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, हा ग्राहक कोणी सर्वसामान्य ग्राहक नाही. वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीधारक असलेले अस्थिशल्यविशारद म्हणजेच ‘ऑर्थोपेडिक सर्जन’ असलेल्या आणि स्वत:चे एक स्वतंत्र रुग्णालय असलेले कर्जतमधील एक प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. घन:श्याम नाझीरकर यांनाच ‘नॅशनल इन्शुरन्स’ या विमा कंपनीकडून मेडिक्लेम पॉलिसीच्या संदर्भात हा कटू अनुभव घ्यावा लागला आहे. अर्थात, डॉ. नाझीरकर यांनी चिकाटी न सोडता ‘जनजागृती ग्राहक मंचा’च्या कर्जत शाखेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत देसाई यांच्या सक्रिय व बहुमोल सहकार्याने जवळजवळ दोन वर्षे सातत्यपूर्ण लढा दिल्यामुळे अखेर त्यांना न्याय मिळू शकला आहे.