Leading International Marathi News Daily
रविवार, १४ जून २००९

शक्ती प्रस्थापित होईल
गुरू, शनी, राहूचं सहकार्य रविवारच्या सूर्य राश्यांतरामुळे व्यापक आणि शक्ती प्रस्थापित करणारे ठरेल. गुरुवारच्या रवी- गुरू नवपंचम योगाच्या आसपास विशेष घटना घडेल. त्याची प्रचीती सुरू असलेल्या व्यवहारात आणि उलाढालीत येईल. आर्थिक, व्यावसायिक, राजकीय प्रांतात मेष व्यक्ती आघाडीवर राहतील. रवी-हर्षल केंद्रयोग होत असल्याने आरोग्य आणि अधिकार या संबंधात सतर्क राहा.
दिनांक- १४, १५, १८, १९ शुभकाळ
महिलांना- प्रपंच खूश राहील. समाजात चमकाल.

विघ्ने दूर होतील
राशिस्थानी बुध, भाग्यात राहू, दशमात गुरू आणि गुरुवारचा रवी- गुरू नवपंचम योग विचाराच्या वेगातून भरभर निर्णय घेतले जातील. आणि केलेल्या कृतीला भरघोस यशही मिळेल. मिथुन राशीत रवी प्राप्ती- प्रपंचात प्रसन्नता निर्माण करेल. रवी-नेपच्यून नवपंचम योग धर्मकार्ये, आधुनिक शोध यातून समाधान मिळणारी सफलता देईल. चतुर्थातल्या शनीमधून येणारी विघ्ने हुशारीनं संपवता येतील.
दिनांक - १४ ते १७ शुभकाळ
महिलांना - कर्तृत्वाचा ठसा उमटवता येईल.

प्रगतीचा काळ
रविवारी सूर्य राशिस्थानी येत आहे. गुरू, शनी अनुकूल आहे. शुक्र- मंगळ सहयोगातून मिळणारा उत्साह, हालचाली वेगाने होतील. गुरुवारच्या रवी- गुरू नवपंचम योगाच्या आसपास याच समीकरणातून एखादे घबाड हाती लागण्याचा संभव नाकारता येत नाही. शेतीची कामे मार्गी लागतील. नवे उद्योग- प्रस्ताव समोर येतील. प्रवास कराल. समाजकार्यात चमकाल. प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. बुध व्ययस्थानी आहे. घाईगर्दीने शब्दांचा उपयोग करू नका.
दिनांक - १४ ते १८ शुभकाळ.
महिलांना - कौटुंबिक सुख लाभेल.

नशीब उजळून निघेल
साडेसाती, अष्टमात गुरू यांच्या अशुभ काळातही दशमातील शुक्र- मंगळाचे सहकार्य, लाभातील बुधाचे युक्तीक्रम, सप्तमांत राहू यांच्यामुळे अशुभ परिणाम नियंत्रित करून, कर्क व्यक्तींना महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. अवास्तव साहस आणि कायद्याची शक्ती या संबंधात सतर्क राहून केलेल्या कृतीमुळे व्यापार, राजकारण, कला, साहित्य, विज्ञान प्रांतातील व्यक्तींचे नशीब उजळून निघेल.
दिनांक - १६ ते २० दरम्यान त्याची प्रचीती यावी.
महिलांना - प्रयत्नांचा वेग वाढवा, यश मिळेल.

आपत्ती कमी होतील
साडेसाती आणि अनिष्ट राहू, केतू असा काळ प्रपंच ते प्राप्ती आणि मन:शांती यामध्ये समस्यांची गर्दी करणाराच असतो. गुरूची कृपा, सूर्य- बुध अनुकूल असल्याने संयम आणि सत्य यांचा प्रवासात उपयोग केला, तर गुरुवारच्या सूर्य- गुरू नवपंचम योगाच्या आसपास समस्यांची गर्दी कमी करून बौद्धिक, राजकीय क्षेत्रात काही प्रमाणात व्यवहारात मिळणारी सफलता पुढे घेऊन जाऊ शकेल.
दिनांक - १४, १५, १८, १९ शुभकाळ
महिलांना - चक्रातून बाहेर पडाल.

नवे मार्ग सापडतील
साडेसाती, गुरूची नाराजी यामधून मार्ग शोधण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करावे लागतील. त्यात भाग्यात बुध, दशमात सूर्य, पंचमात राहू यांचं सहकार्य मिळेल आणि शनिवापर्यंत काही प्रांतांत बाजी मारता येईल. अष्टमात शुक्र-मंगळ असेपर्यंत प्रपंच आणि प्राप्ती या संबंधात सतर्क राहावे लागणार. अवास्तव आश्वासने त्रासदायक ठरतील. रवी-नेपच्यून नवपंचम योग पारमार्थिक मार्गात चमत्काराचा ठरतो.
दिनांक - १६, १७, २० शुभकाळ
महिलांना - अवघड जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

प्रसन्न ग्रहकाळ
पंचमात गुरू, लाभात शनी, रविवारी भाग्यात प्रवेशणारा सूर्य आणि शुक्र-मंगळ प्रसन्न असल्याने बरीचशी महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. नव्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करता येईल. गुरुवारचा सूर्य-गुरू नवपंचम योग अधिकार आणि यश यांच्यातून प्रबलता प्रस्थापित करणारच आहे. त्याचा लाभ व्यापार, राजकारण, शिक्षण, साहित्य यामध्ये मिळवता येईल. रवी-हर्षल केंद्रयोग होत असल्याने वाहनांचा वेग, आरोग्याची पथ्ये यामध्ये दुर्लक्ष करू नये.
दिनांक : १४, १५, १८, १९ शुभकाळ.
महिलांना : मार्ग सापडतील, कृती यश देईल.

बदल करू नका
चतुर्थात गुरू, अष्टमात प्रवेश करीत असलेला सूर्य यांच्यातील प्रतिक्रिया नव्या प्रश्नांना व्यवहारात उभे करतील. त्यातून संभ्रम वाढतील. पण विचलित होऊन सरळ मार्ग, स्वच्छ कृती यात बदल करू नका. अनुकूल शनी-राहू, सप्तमांत बुध शनिवापर्यंत प्रतिष्ठा मजबूत ठेवणारी सफलता मिळवून देत राहतील. संपर्क, सबंध, प्रवास, चर्चा-भेटी यांचा झटपट उपयोग करून घेणे आवश्यक आहे. प्रकृतीचे तंत्र सांभाळा.
दिनांक : १६, १७, २० शुभकाळ.
महिलांना : अडचणी येतील आणि जातील, आपण यश मिळवाल.

चित्र आकर्षक होईल
पराक्रमी गुरू, भाग्यात शनी, रविवारचं सूर्य राश्यांतर आणि गुरुवारी होत असलेला रवी- गुरू नवपंचम योग यातूनच धनू व्यक्तीच्या प्रगतीचे चित्र आकर्षक होत राहणार आहे. अवघड स्थगित योजना मार्गी लावता येतील. प्रपंचाची गाडी रुळावर आणू शकाल. अर्थप्राप्तीचे मार्ग निर्वेध करता येतील. यात शुक्र-मंगळ सहयोगाचेही सहकार्य मिळेल. रवी- हर्षलाच्या केंद्र योगात वाहनाचा वेग, अधिकारातील मस्ती यांच्यातून आपत्ती येऊ शकते. सावध राहा.
दिनांक : १४, १५, १८, १९ अनुकूल काळ.
महिलांना : कार्यमार्ग निर्वेध होतील. कर्तृत्व उजळून निघेल.

कराल ती पूर्व
राशिस्थानी राहू, मेष राशीत शुक्र- मंगळ, रविवारी होत असलेले सूर्य राश्यांतर आणि गुरूची कृपा यामुळे कराल ती पूर्व अशाच प्रतिक्रिया उमटत राहणार आहेत. गुरुवारच्या रवी- गुरू नवपंचम योगाच्या आसपास त्याची उंची आणि व्याप्ती मोठी होणे शक्य आहे. त्यामुळे व्यापारपेठ, राजकारण, विज्ञान, शिक्षण, साहित्य यामध्ये मकर व्यक्ती प्रभाव निर्माण करू शकतील. अष्टमातला शनी गुप्त शत्रूकडून त्रास देत असतो. सतर्क राहा आणि पुढे चला.
दिनांक : १४ ते १७ यश मिळेल.
महिलांना : अपेक्षित यश मिळवता येईल. प्रपंचात खूश राहाल, समाजात चमकाल.

यश ठसठशीत होईल
राशिस्थानी गुरू, मेष राशीत शुक्र-मंगळ, रविवारी सूर्य पंचमात प्रवेश करीत आहे. प्रयत्न-प्रगतीच्या समन्वयातून कुंभ व्यक्ती अनेक क्षेत्रांत आघाडीवर येत असल्याचे स्पष्ट होत राहील. गुरुवारच्या रवी-गुरू नवपंचम योगाच्या आसपास त्यात ठसठशीतपणा राहील. त्याचे प्रतिसाद दूरवर उमटतील. कला, साहित्य, शिक्षण, व्यापार, शेती यातून मोठे लाभ होतील. जागेचा प्रश्न सुटेल. राजकीय प्रभाव वाढेल. रवी-नेपच्यून नवपंचम योग धार्मिक तपातून आनंद देतो.
दिनांक : १४ ते १८ प्रभाव वाढत राहील.
महिलांना : सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संसार आकर्षक कराल.

संघर्ष करू नका
द्वितीयात शुक्र-मंगळ, लाभात राहू यांच्या आधाराने नियमित उपक्रम सुरू ठेवता येतील. परंतु पावसाळा सुरू झालेला आहे. गुरू-शनी त्रास देत आहेत, रवी चतुर्थात प्रवेश करीत आहे. त्यामुळे वेळापत्रकात सतत बदल करावे लागतील. साहस आणि स्पर्धा अशा काळात सफलतेचा आनंद मिळू देत नाही. अशा ग्रहकाळात दुसऱ्यांवर विसंबून कोणतीही लढाई करायची नसते. कोणतेही पाऊल उचलताना स्वत:च्या शक्तीचाच विचार करा. राजकारण, व्यापारी, तेजी-मंदी, सामाजिक चळवळी, महत्त्वाचे नवे करार, अभिनव प्रयोग यांचा समावेश त्यात महत्त्वाचा ठरतो. प्रकृती सांभाळा.
दिनांक : १६ ते २० पुण्याईच मदतीला धावून येणार आहे.
महिलांना : धावपळ, दगदग होईल; पण अखेर गोड होईल, आनंद मिळेल.