Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

युवा पिढीला आत्मविश्वासाची गरज - शहा
फलटण, १४ जून / वार्ताहर

आजच्या युवा पिढीतून नकारात्मकतेची भावना निघाली पाहिजे व कोणतेही कार्य आत्मविश्वासाने करताना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्रश्नचार्य डॉ.

 

राजेंद्र शहा यांनी केले.
मिरगाव (ता. फलटण) येथील समता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या अहिल्यामाता व्याख्यानमालेतील ‘भारतीय संस्कृती व वास्तव परिस्थिती’ या विषयावर प्रश्नचार्य शहा बोलत होते. अध्यक्षस्थानी फलटण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रश्न. रमेश आढाव
होते.
उदयाला आली व जिचा अस्त झाला नाही, अशी एकमेव भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीवर आघात होत चालला आहे. नवी पिढी तल्लख आहे. पण आपण त्यांना संस्कार द्यायला कमी पडलो ही बाब त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिली. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे घरातच मुलांवर चांगले संस्कार होत असत. आज मात्र प्रसारमाध्यमांमुळे व चित्रपटांमुळे नव्या पिढीवर चुकीचे परिणाम होत असल्याचे शहा यांनी सांगितले.
स्त्रियांच्या संदर्भातील दृष्टिकोन सध्या बदलत चालला असून, ज्या देशात स्त्रीला महत्त्व दिले जाते, ते देश प्रगतिपथावर आहेत, असे स्पष्ट करून सध्या देशप्रेम कमी होत असल्याबद्दल शहा यांनी खंत व्यक्त केली.
प्रश्न. आढाव म्हणाले, महामानवांचा इतिहास समाजासमोर आणण्याची जबाबदारी युवकांवर आहे. समाजासाठी, देशासाठी काम करणे हे सामाजिक बांधिलकीतून येणारे उत्तरदायित्व आहे, असे सांगून प्रत्येकाने आपण वाचलेले, ऐकलेले विचार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे, असे आवाहन प्रश्न. आढाव यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन सरक यांनी तर सूत्रसंचालन भाऊसाहेब सरक यांनी केले. आभार हणमंत सरक यांनी मानले.