Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उत्तम आरोग्यासाठी आनंद, समाधान उपकारक - डॉ. हर्षे
सातारा, १४ जून/प्रतिनिधी

उत्तम चांगल्या आरोग्यासाठी आनंद व समाधान उपकारक असल्याने ही वृत्ती जोपासावी, योगसाधना करावी, असे आवाहन येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र हर्षे यांनी केले.

 

येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अखंड ज्ञानदान उपक्रमाचा शुभारंभ डॉ. हर्षे यांच्या ‘आरोग्यासाठी योग’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माते व ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले होते.
डॉ. हर्षे म्हणाले की, योगसाधना केल्याने मन प्रसन्न होते. मनाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. माणूस उत्साही, समाधानी, आनंदी असेल तरच व्यक्तिमत्त्व चांगले राहते. यालाच आरोग्य राखणे असे म्हणतात. शारीरिक व मानसिक असे दोन्ही प्रकारचे आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. मनातील नकारात्मक भूमिका दूर केली पाहिजे. योगसाधना केल्यास मनाला दिशा मिळून सकारात्मक बदल घडून येतात.
पूर्वीच्या काळातील संसर्गजन्य साथीचे आजार प्रगत विज्ञानशास्त्र, स्वच्छता या आधारे आपण हद्दपार केले आहेत. परंतु, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे बदलत्या काळात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब आदी रोग प्रश्नमुख्याने वाढले आहेत. शरीरात प्रतिकार करण्याची व्यवस्था असते. ही प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. चांगला आहार, पुरेशी विश्रांती व योग्य व्यायामाने ती साध्य होते. योगामुळे मनाला आवर घालून ऊर्जा व चेतना वाढवता येते.
अरुण गोडबोले यांनी अखंड ज्ञानदान उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बोडस यांनी प्रश्नस्ताविक केले. सिद्धार्थ तडसरे यांनी आभार मानले. हरिभाऊ देशपांडे यांनी स्वागत केले.