Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पंढरपूरमध्ये नाण्यांची तीव्र टंचाई
पंढरपूर, १४ जून/वार्ताहर

पंढरी नगरीत कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीची टंचाई जाणवेल याचा नेम नाही. गेले पंधरा ते वीस दिवस नागरिक नाणेटंचाईने ग्रासले आहेत. एक, दोन, पाच रुपये या नाण्यांची कमालीची टंचाई भासत आहे. ऐन यात्रेत नाणेटंचाई भासू नये म्हणून अनेकांनी नाणी साठवून ठेवली आहेत. त्यामुळे

 

टंचाई भासत आहे.
आषाढी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर आली असून यात्रा काळात तर नाण्यांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते. या करिता राष्ट्रीयीकृत बँकांनी वारी करता किमान ३ कोटी रुपयांची दोन व पाच रुपयांची नाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
यात्रा काळात येथील पंढरपूर अर्बन बँक मुख्य शाखा व्यापाऱ्यांच्या सोयी करता सुटय़ा नाण्याची सोय करते. त्याप्रमाणे इतर नागरी बँकांनीही सहकार्य करून नाण्याची टंचाई दूर करावी.
पंढरीत काहीजण नाण्याचा व्यापार करत असून पुणे, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणी शेकडा १० ते १५ रुपये कमिशनवर पाठवली जातात, अशी चर्चा असून त्यामुळेही पंढरीत ऐन यात्रेच्या तोंडावर नाणेटंचाई भासत आहे, तरी बँकांनी नाणी उपलब्ध करून देऊन गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.