Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर नांगरे
सांगली, १४ जून / प्रतिनिधी

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मुरलीधर नांगरे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र रोहयोमंत्री मदन पाटील यांच्या हस्ते श्री. नांगरे यांना

 

देण्यात आले.
आमदार मदन पाटील यांची राज्य मंत्रिमंडळात रोहयोमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर गेले सहा महिने हे पद रिक्त होते. या समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर नांगरे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. श्री. नांगरे हे मदनभाऊ पाटील युवा मंच महापालिका क्षेत्र व सांगली शहर पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. तसेच महापालिका क्षेत्रात सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या लक्ष्मीनारायण सांस्कृतिक मंडळाच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ अधिकाधिक गोरगरीब कुटुंबातील निराधार महिला व पुरुषांना मिळवून देण्यासाठी रत्नाकर नांगरे यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी त्यांना सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही, रोहयोमंत्री मदन पाटील यांनी दिली. यावेळी मदन पाटील यांच्या हस्ते श्री. नांगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य नगरसेवक अजित सूर्यवंशी, माजी नगरसेवक किरण कांबळे, श्रीमती ज्योती आदाटे, धनंजय झांबरे, बलभीम गोसावी, रियाज जमादार, गोपीनाथ जाधव, विजय राजमाने व शहाजी भोसले आदी उपस्थित होते.