Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पर्यावरणाचे सगळ्यांनीच संगोपन करणे गरजेचे - विकास देशमुख
महाबळेश्वर, १४ जून/वार्ताहर

महाबळेश्वरच्या पर्यावरणास असाधारण महत्त्व असून, त्यामुळेच येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. म्हणून येथील पर्यावरणाचे जनत व संगोपन करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे

 

गरजेचे आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी केले.
महाबळेश्वर पालिका संचालित प्रश्नथमिक शाळा नं.१ व २ यांना खेळासाठी मैदान नव्हते. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत होती. जिल्हाधिकारी देशमुख यांनी ही अडचण लक्षात घेऊन शाळेजवळील भूखंड खेळाच्या मैदानासाठी नगरपालिकेकडे हस्तांतरित केला व येथे सुंदर मैदान विकसित करण्यात आले. या मैदानाचे उद्घाटन व मैदान परिसरात वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष शेख यांच्यासह उपनगराध्यक्षा छाया शिंदे, शिक्षण समिती सभापती डी. एम. बावळेकर, नगरसेवक पी. डी. पार्टे, नगरसेवक किसनशेठ शिंदे, माजी नगराध्यक्ष कांदळकर, खामकर, जाधव उपस्थित होते.
ते म्हणाले की, पर्यटनस्थळ टिकायचे असेल तर सर्वप्रथम पर्यावरण टिकविले पाहिजे. पर्यावरण जतन केले तरच पर्यटक येणार आणि पर्यटक आला तरच रोजगार मिळणार यासाठी त्याचे रक्षण केले पाहिजे व पर्यावरणाच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सर्वानी विरोध केला पाहिजे.