Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शरद इन्स्टिटय़ूटला विद्यापीठाची मान्यता
इचलकरंजी, १४ जून/वार्ताहर

येथील सांगली नाक्याजवळील शरद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स व

 

टेलि-कम्युनिकेशन अशा पाच विभागांचे अभ्यासक्रम येथे या वर्षीपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त सुसज्ज असणाऱ्या अद्ययावत शैक्षणिक संकुलाची उभारणी करणे हे दिवंगत नेते श्यामराव पाटील-यड्रावकर यांचे स्वप्न होते. शरद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेजच्या उभारणीमुळे ही स्वप्नपूर्ती होत आहे. या डिग्री कॉलेजला ए.आय.सी.टी.ई. आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे.
उपरोक्त सर्व विभागांसाठी आवश्यक असणारी तांत्रिक सामग्री व आधुनिक यंत्रे कार्यान्वित केली आहेत. प्रत्येक विभागासाठी ६० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. ११ एकराच्या विस्तृत परिसरात डिग्री कॉलेजसाठी मध्यवर्ती ठिकाणी ६० हजार चौरस फुटांचे बांधकाम करून कॉलेजची प्रशस्त इमारत उभी केली आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांस अस्खलित इंग्रजी संभाषणाची समस्या भेडसावते हे लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच ही समस्या दूर करण्यासाठी भर दिला जाणार आहे.
तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याशिवाय ११ हजार चौरस फुटांचे वर्कशॉप, वसतिगृह, उपाहारगृह, ग्रंथालय यासह अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. डिग्री कॉलेजच्या मान्यतेसाठी ए.आय.सी.टी.ई.चे अध्यक्ष आर. ई. यादव, देवरथ सिंग, डॉ. एस. के. महाजन, शिक्षणमंत्री राजेश टोपे यांचे सहकार्य लाभल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.