Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

साताऱ्यात १९२ ठिकाणी टँकरने पाणी
सातारा, १४ जून/प्रतिनिधी

मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्य़ात टंचाई परिस्थिती भीषण होत चालली असून,

 

पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त १९२ ठिकाण ३९ टँकरद्वारे १ लाख १५ हजार ६०७ बाधित लोकसंख्येस पिण्याचे पाणी पुरवठा सुरू केला आहे.
टंचाई परिस्थितीत जनतेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ९६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३७ विहिरींचे खटाव तालुक्यात अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या खालोखाल माण व कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी १७, फलटणमध्ये ७, वाई व महाबळेश्वरमध्ये प्रत्येकी ५, पाटणमध्ये ३, खंडाळा व जावळीत प्रत्येकी २ व साताऱ्यात १ विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे.
तालुकानिहाय सुरू करण्यात आलेल्या टँकरची संख्या, कंसात ठिकाणांची संख्या व त्यानंतर बाधित लोकसंख्या पुढीलप्रमाणे आहे. माण-९ (६२) २८,११०, खटाव-६ (१७) १८,७६७, खंडाळा-१ (४) १८५६, फलटण-४ (३१) ८७३०, पाटण-४ (२०) २२,६०८, जावली-५ (२३) १२,०८१, कोरेगाव-४ (१०), १२,३३९, सातारा-१ (५) २१२९, वाई-२ (७) २९४९, महाबळेश्वर-३ (१३) ६०३८, एकूण-३ (१९२) १,१५,६०७.
तालुक्यात बैलगाडीने एका वस्तीतील ५० लोकांना तर पाटण तालुक्यातील ३ वाडय़ांमधील ११२६ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.