Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

सीईटीत अकोल्याचा सजल विदर्भातून प्रथम
अलमास पुन्हा ‘चमकली’.. मुलींमधून पहिली, विदर्भातून दुसरी
अक्षय भारती भटक्या जमातीतून राज्यात प्रथम, सौरभ डोईफोडे ओबीसीतून प्रथम
शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची बाजी , विदर्भाचा निकाल १८.७९ टक्के
नागपूर, १४ जून/ प्रतिनिधी

अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय शिक्षण महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) रविवारी जाहीर झालेल्या निकालात अकोल्याच्या आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी सजल सतीश चिद्दरवार हा विदर्भातून प्रथम आला आहे. त्याला २०० पैकी १९६ गुण मिळाले आहेत. राज्याच्या गुणवत्ता यादीत तो चौथा आहे. बारावीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आलेली शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची अलमास नझीम सय्यद ही सीईटीत विदर्भातून दुसरी तर मुलींमधून पहिली आणि राज्याच्या गुणवत्ता यादीत १६ वी आली आहे.

असह्य़ उकाडा
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्यांची तयारी करून बसलेला शेतकरी चिंतेत असतानाच असह्य़ उकाडय़ामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात वातावरण ढगाळ राहात असले तरी पावसाचा पत्ता नाही. महाराष्ट्राच्या दारात आलेला मान्सून जागेवरच निष्क्रीय झाल्यामुळे पावसासाठी आणखी किती काळ ताटकळत बसावे लागेल, याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते आहे. वैदर्भीय नागरिक लहरी हवामानाचा अनुभव घेत आहेत. कधी कडक उन्हं असते, तर कधी पावसाचे चार थेंब येऊन जातात.

गृहनिर्माण क्षेत्रात नागपुरात प्रथमच २ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक
आंतरराष्ट्रीय कंपनी ‘एडास’ प्रकल्पाची रचना संकल्पित करणार ,दोन वर्षात पहिला टप्पा पूर्ण होणार
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

एकीकडे ‘रियल इस्टेट’ व्यवसायावर मंदीचे सावट असल्याची चर्चा सुरु असतानाच नागपूर येथे गृहनिर्माण क्षेत्रात दोन हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक होणाऱ्या ‘द एम्पीरियन’ या गृहनिर्माण प्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन झाले. नागपुरातील रियल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य आर्कर समूह आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूक करणारा फायर कॅपिटल फंड लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. फायर कॅपिटल फंड कंपनीची २००४ मध्ये मॉरिशस येथे स्थापना झाली.

बारावीतील गुणवंत सीईटीत माघारले!
नागपूर, १४ जून/ प्रतिनिधी

१२ वीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यात आघाडी घेणारे वैदर्भीय गुणवंत वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सामाईक प्रवेश पूर्व परीक्षेत (सीईटी) माघारल्याचे आज जाहीर झालेल्या निकालातून स्पष्ट होते. १२ वीच्या परीक्षेत संपूर्ण राज्यातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक वैदर्भीय कन्यांनी पटकाविला होता. नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची अलमास नाझीम सय्यद राज्यातून प्रथम, अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाची अनुश्री बूब दुसरी आणि नागपूरच्याच आंबेडकर महाविद्यालयाची राधिका दशपुत्र राज्यातून तिसरी आली होती.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा अलमासचा संकल्प
वेळेवरच्या घाईगडबडीत सहा उत्तरे चुकली

नागपूर, १४ जून/ प्रतिनिधी

वैद्यकीय क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान अवगत करून ग्रामीण भागात सेवा देणार असल्याचा संकल्प अलमास नाझीम सय्यद हिने सोडला आहे. बारावीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकवल्यानंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विदर्भातून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने तिला दु:ख झाले परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार असल्याचे समाधान तिला आहे. ‘पीएमटी’ परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले.

राष्ट्रवादीच्या स्थापनादिनानिमित्त रक्तदान शिबीर
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शारदा चौकातील कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ६६ कार्यकत्यार्ंनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे उपस्थित होते. याबरोबरच नगरसेवक अशोक काटले, प्रवीण कुंटे, राजू नागुलवार, हरीश दिकोंडवार, महादेव फुके, सदाशिव वाठ, प्रश्न. देविदास घोडे, मधुकर बुचे आदी कार्यकर्ते प्रश्नमुख्याने उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्यांमध्ये दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्यासह वार्ड अध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रशांत वानखेडे, जगदीश डवरे, गोपाल ठाकूर, नेमीनाथ लांडे, अमोल बेले, गिरीश लेंडे, मनोज इंगळे, जीवन फुंडे, धनंजय लिफटे, पंकज वानखेडे, चंद्रशेखर खोपडे यांचा समावेश होता. रक्तदान करण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला. त्यात छाया बाळबुधे, नीलिमा मालापुरे, प्रियंका बोलधने, कांचन साखरे, मंगला बोलधने यांनी रक्तदान केले. लाईफ लाईन रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनात सहकार्य केले. ईश्वर बाळबुधे यांनी प्रश्नस्ताविक केले. प्रशांत वानखेडे यांनी आभार मानले.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह चौघांना अटक
नागपूर, १४ जून / प्रतिनिधी

गच्चीवरून पडून एका विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पाचपावली पोलिसांनी तिच्या पतीसह चार आरोपींना अटक केली आहे. सुषमा विनोद येरपुडे (रा. रामनगर, बारईपुरा) हे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गच्चीवरून अचानक खाली पडल्याने तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी काल आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र तिचा पती विनोद रामदास येरपुडे, दीर प्रमोद, कमलेश, सासरा रामदास येरपुडे, सासू रत्ना, आतेसासू माया मधुकर डोंगरे (सर्व रा़ लालगंज, बारईपुरा) यांनी माहेरून पैसे आणण्यास सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, अशी तक्रार सुषमाचे वडील तुलाराम यादव दाते (रा़ निमलताई, ता़ सावनेर) यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात केली. त्यावरून गुन्हा दाखल करून विनोद रामदास येरपुडे, दीर प्रमोद, कमलेश, सासरा रामदास येरपुडे या चौघांना पोलिसांनी आज अटक केली़