Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

अभियांत्रिकी ‘सीईटी’त सानिया, माधुरी प्रथम
पुणे, १४ जून/खास प्रतिनिधी

प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) पुणे विद्यापीठ विभागामध्ये श्रीरामपूरमधील नारायणराव बोरावडे महाविद्यालयाची सानिया सलीम शेख आणि पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयाच्या माधुरी महेंद्र नागरे यांनी २०० पैकी १९७ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकाविला. अभियांत्रिकी, वैद्यकीय व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता १२ मे रोजी ‘सीईटी’ घेण्यात आली होती.त्यासाठी राज्यभरात एकूण दोन लाख ४५ हजार ६१७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २ लाख १६ हजार ७२५ विद्यार्थी बसले होते. पुणे विद्यापीठ विभागामधील ४४ हजार १५० विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता.

मोफत विद्यार्थी वाहतूक
जाहीरनाम्यात आश्वासन देणाऱ्या राष्ट्रवादीकडूनच मिठाची गुळणी
सुनील माळी, पुणे, १४ जून

शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलचा मोफत प्रवास देण्याच्या योजनेचा पाठपुरावा शिवसेनेकडून हिरिरीने होत असताना महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याद्वारे दिलेल्या लेखी आश्वासनाचा विसर त्या पक्षाला पडल्याचे दिसते. निवडणूक जाहीरनाम्यात याबाबत आश्वासन देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिठाची गुळणी धरून गप्प राहिला आहे.

कोथिंबीर चौदा, तर मुळा बारा रुपये!
पुणे, १४ जून / प्रतिनिधी

मार्केट यार्डात स्थानिक भागातून होणारी गावरान कोथिंबिरीची आवक घटल्याने एका गड्डीला चौदा रुपये, तर मेथी, मुळय़ाच्या गड्डीला अनुक्रमे दहा आणि बारा रुपये आता ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. कोथिंबिरीची आवक घटल्याने दर वाढले असले तरी गड्डीचा आकारही कमी झाल्याचे व्यापारी सांगतात. मार्केट यार्डात पुणे जिल्हय़ाच्या स्थानिक भागातून कोथिंबिरीची होणारी नेहमीची आवक आज घटली.उन्हामुळे माल खराब झाला असून चांगल्या प्रतीची कोिथबिरीची फारशी आवक होऊ शकली नाही.

एकेरी वाहतुकीमुळे मार्केट यार्डातील कोंडी दूर
पुणे, १४ जून / प्रतिनिधी

वाहनांमुळे होणारी गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे मार्केट यार्डातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी राबविण्यास प्रश्नरंभ केलेल्या एकेरी वाहतुकीच्या पहिल्याच दिवशी, रविवारी वाहतूक सुरळीत होण्यात यश आल्याचे दिसून आले. पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शेतीमालाची वाहतूक क रणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून एकेरी वाहतूक प्रयोगास प्रश्नरंभ क रण्यात आला. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक शैलेश कोतमिरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष शिवलाल भोसले, विलास भुजबळ , गणेश घुले, समितीचे उपसचिव सुरेश शेवाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

.. तर शहर बकाल होईल- पवार
पुणे, १४ जून/ प्रतिनिधी

मेट्रोसह दळणवळण, नवीन बांधकामे, शहराची वाढती लोकसंख्या याबाबत नियोजन करण्याची गरज असून असे न झाल्यास पुढील काही काळामध्ये शहराची स्थिती बकाल झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कृषिमंत्री शरद पार यांनी आज दिला. सॅलिसबरी पार्क येथील गिडने पार्क या वसाहतीचा पूनावाला पार्क असे नामकरण व उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी खासदार सुरेश कलमाडी, आमदार रमेश बागवे, महापौर राजलक्ष्मी भोसले, आमदार कमल ढोले पाटील, आमदार बाळासाहेब शिवरकर,

मंडईत स्वच्छता मोहीम प्रश्नरंभ
लोकसत्ता इफेक्ट
हडपसर, १४ जून/वार्ताहर

हडपसर येथील मंडईमध्ये महापालिकेच्या वतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून ठिकठिकाणी साठलेला कचरा उचलल्यामुळे शेतकरी, भाजीविक्रेते व ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हडपसर येथील पंडित नेहरू भाजी मार्केटमध्ये स्वच्छता कामगारांच्या अभावामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले होते. त्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. या संदर्भात शेतकरी व्यापाऱ्यांनी दोन दिवसात स्वच्छता न केल्यास सोलापूर रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तशा आशयाची बातमी ‘लोकसत्ता’मध्ये दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. या बातमीचा इफेक्ट झाला. त्यामुळे महापालिकेच्या वतीने तातडीने पावले उचलून जादा स्वच्छता कामगारांच्या साहाय्याने स्वच्छतेस सुरुवात केली असल्याचे अनिल काळे व राजेंद्र बाजारे यांनी सांगितले. सर्वप्रथम ‘लोकसत्ता’मधून येथील स्वच्छतेचा प्रश्न मांडल्यामुळेच महापालिकेने तातडीने याकडे लक्ष देऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केल्याने शेतकरी, भाजी विक्रेते यांना दिलासा मिळाला असल्याचे येथील व्यापारी व नागरिकांनी सांगितले आहे. हा एक लोकसत्ताच्या बातमीचा इफेक्ट असल्याचे काळे व बाजारे यांचे म्हणणे आहे.

ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या ध्वनिफितीचे उद्या प्रकाशन
पुणे, १४ जून / प्रतिनिधी

‘सावळे परब्रह्म’ या ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या ध्वनिफितीचे प्रकाशन येत्या १६ जून रोजी सायं. ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार आहे, अशी माहिती राहुल धोंगडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या ध्वनिफितीची मूळ संकल्पना राहुल धोंगडे यांची असून राहुल घोरपडे यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. सुरेश वाडकर यांनी हे अभंग स्वरबद्ध केले आहेत. या ध्वनिफितीचे प्रकाशन इंडियन ओव्हरसीज बँकेचे अध्यक्ष सुहास भट व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम व्हिडिओकॉन समूहाने प्रस्तुत केला आहे, अशी माहिती धोंगडे यांनी दिली.

हर्षवर्धन पाटलांच्या राजीनाम्याची मागणी
इंदापूर, १४ जून/वार्ताहर

अनाथाश्रम व बालिका सदनांना दिलेल्या अनुदानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून महिला व बालकल्याण खात्याचे तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी २२ जून रोजी इंदापूर येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इंदापूर तालुका नागरिक कृती समितीच्या वतीने प्रदीप गारटकर, राजेश जामदार, दशरथ माने, प्रतापराव पाटील, डी. एन. जगताप यांनी दिला आहे. इंदापूर येथे आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २२ जून रोजी इंदापूर नगरपालिकेसमोर निषेध सभा, तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात येऊन पुणे-सोलापूर रास्ता रोको आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदीप गारटकर यांनी दिली. तत्पूर्वी इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका नागरिक कृती समितीच्या वतीने २२ जूनच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुकाभर जाहीर सभा घेऊन जनजागरण करण्यात येणार आहे. या समितीत बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

सासवड रस्त्यावरून गावठी दारू जप्त
हडपसर, १४ जून / वार्ताहर

हडपसर ते सासवड रस्त्यावरून काल रात्री आठ वाजता मारुती कारमधील सुमारे पाच हजार ६०० रुपयांची गावठी दारू हडपसर पोलिसांनी पकडली. गोंधळेनगर कमानीजवळ ८ हत्ती (दारूचे कॅन) २८० लिटर गावठी दारू मारुती कारमधून नेत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. विश्वसनीय सूत्रांनी यासंबंधीची माहिती हडपसर पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे ताबडतोब पोलीस नाईक ए. एस. आटोळे आणि पोलीस हवालदार डी. एस. म्हेत्रे यांनी पाठलाग करून मारुतीकारसह दारू जप्त केली. या गावठी दारूची किंमत पाच हजार ६०० रुपये आहे. एकूण ३० हजार ६०० रुपयांचा माल हडपसर पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबतचा अधिक तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एस. आटोळे आणि पोलीस हवालदार डी. एस. म्हेत्रे करीत आहेत.

पिंपरी महापालिकेच्या पाण्यात अळ्या!
पिंपरी,१४ जून / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीमाथा येथील सार्वजनिक नळकोंडाळ्याला आज दुपारी अळ्या मिश्रीत घाण पाणी आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. या पाण्याचे नमुणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. अण्णासाहेब मगर स्टेडीयम जवळील गवळीमाथा येथे रस्त्याच्या उताराला असलेल्या सार्वजनिक कोंडाळ्यातून गढूळ व आळ्या असलेले पाणी आले.ते पाहून नागरिकांनी स्थानिक नगरसेवक बाळासाहेब भुंबे यांच्याकडे गाऱ्हाणे केले. त्यांनी तातडिने महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा व भुयारीगटर विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. अधिकारी व कर्मचारी यांनी लगोलग त्या भागातील पाण्याच्या पाईपलाईनची तपासणी केली. सांडपाण्याच्या गटारीमधून ही पाईपलाईन गेल्याचे त्यांना आढळले. मात्र नेमके हे घाण पामी कोठून आले त्याचा छडा लागला नाही. दोन नळांमधूनही कचरा मिश्रीत गढूळ पाणी आल्याचे भुंबे यांनी सांगितले. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. रविवारची सुट्टी असल्याने उद्या या भागातील सर्व भूमीगत गटारे व पाण्याच्या पाईपलाईनची तपासणी करण्यात येणार आहे, असे भुबें यांनी सांगितले.