Leading International Marathi News Daily

सोमवार, १५ जून २००९

मजुरांचा अत्यल्प सहभाग; यंत्रणेची अनुत्सुकता
अमरावती विभागात रोजगार हमी योजनेचा बोजवारा

मोहन अटाळकर, अमरावती, १४ जून

मजुरीचे कमी दर आणि योजना राबवणाऱ्या यंत्रणेची अनुत्सुकता यामुळे अमरावती विभागात रोजगार हमी योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून यंदा मजुरांच्या अत्यल्प सहभागाने योजनेतील मर्यादा उघड झाल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये एकूण २५ लाख १८ हजार ६२७ नोंदणी झालेले मजूर आहेत. रोजगार हमी योजना आणि नंतरच्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला.

‘वैद्य’ तापेश्वरांची वरवरची मलमपट्टी!
चंद्रकांत ढाकुलकर

जिल्हा परिषदेला उपरती झाली आणि काहीतरी घडावे, या हेतूने ऐन पावसाळ्यात साथीचे आजार होऊ नये म्हणून की, या काळात असे आजार वाढूच नये म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांनी आताशा ग्रामीण भागातील रुग्णालयांना रात्रीच्या आकस्मिक भेटी देऊन या आरोग्य केंद्रांची पाहणी करण्याचा सपाटा लावला आहे. मोहीम चांगली आहे आणि यामागील हेतूही अर्थातच चांगलाच असला पाहिजे.

न्यूरोसर्जन बनण्याचा सजलचा निर्धार
अकोला, १४ जून / प्रतिनिधी

‘सीईटी’त विदर्भातून प्रथम आलेल्या अकोल्याच्या राधाकिशन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल महाविद्यालयातील सजल सतीश चिद्दरवारने वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर न्यूरोसर्जन बनण्याचा निर्धार केला आहे. मुळचा पुसद येथील सजल चिद्दरवारने यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रश्नध्यापकांना दिले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यूरोसर्जन बनायची इच्छा असल्याचे सजल चिद्दरवारने सांगितले. सजल चिद्दरवारसह आरएलटी महाविद्यालयातील २७ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’त उत्तुंग यश मिळविले आहे.

विकास कामांकडेच अधिक लक्ष
प्रश्नंजळ जैन

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातला वाशीम विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला. काँग्रेसचे सुरेश इंगळे विजयी झाले. सर्वसामान्यांचे नेते म्हणून आमदार सुरेश इंगळे परिचित असून त्यांचे सर्व जाती धर्मातील लोकांशी ऋणानुबंधाचे नाते आहे. विकास कामे करणाऱ्या आमदार सुरेश इंगळे यांना महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही मिळाले. वाशीम विधानसभा मतदारसंघात वाशीम, रिसोड आणि मालेगाव या तीन तालुक्यातील गावांचा समावेश होता.

बल्लारपूरचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
बल्लारपूर, १४ जून / वार्ताहर

नगराध्यक्ष निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बल्लारपूर नगरपालिकेतील काँग्रेसचे १६ नगरसेवक भाजपमधून फुटून निघालेल्या एका नगरसेवकासह १७ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. ३२ सदस्यीय बल्लारपूर पालिकेत काँग्रेस व समर्थक सदस्यांची संख्या २५ असून भाजपचे सदस्य आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपला काहीच स्वारस्य नसल्याने सध्यातरी त्यांचे नगरसेवक तटस्थ आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन नव्या नगराध्यक्ष उमेदवाराची निवड करतील पण, उमेदवार कोण? याबाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अज्ञातस्थळी रवाना झालेल्या नगरसेवकांना देखील याबाबतीत अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. ऐनवेळी ज्या उमेदवाराचे नाव समोर येईल, त्याचे समर्थन काँग्रेसचे सर्व नगरसेवक करतील, अशी ही राजकीय खेळी दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरपालिकेवरील वर्चस्व अबाधित रहावे, याकरिता शर्थीचे प्रयत्न विद्यमान पक्षनेतृत्वाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विद्यानगर वॉर्डातील सदस्य निवडणुकीसंदर्भात शहर काँग्रेस अध्यक्ष व स्वीकृत सदस्य एम.बाल बैरय्या यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी १६ जून ला होणार आहे.

ब्रह्मपुरीत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
ब्रह्मपुरी, १४ जून / वार्ताहर

येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात शिक्षक-पालक सभा व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. भास्कर उराडे तर अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य डॉ.एन.एस. कोकोडे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्रश्नचार्य जी.एन. केला, प्रश्न. मोहन कापगते, डॉ. मोहन वाडेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठय़ा संख्येने पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विलास करंबे, रवींद्र विखार, प्रश्न. जयंत खरवडे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, महाविद्यालयाच्या विकासाबाबत मार्गदर्शन करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. विलास करंबे यांनी मराठा वाङ्मय ‘बी.ए.’ ला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस ११११/- रुपयांचे पारितोषिक घोषित केले. यावेळी प्रश्नचार्य डॉ. एन.एस. कोकोडे यांनी अनेक नवीन योजनांची घोषणा करून पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. संचालन प्रश्न. मोहन कापगते यांनी केले तर प्रश्नस्ताविक डॉ. मोहन वाडेकर यांनी केले. आभार प्रश्न. अनिल कोडापे यांनी मानले. याप्रसंगी प्रश्न. विनोद नरड, प्रश्न. भूत्तमवार, प्रश्न. डांगे, प्रश्न. लेनगुरे, प्रश्न. भास्कर मांडवे आदी उपस्थित होते.

बल्लारपुरात समाजसेवकांचा सत्कार
चंद्रपूर, १४ जून/प्रतिनिधी

बल्लारपूर येथील पेपर मिल बुद्ध पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बल्लारपूर पेपर मिलचे प्रबंधक रमेश अय्यर, ठाणेदार नितनवरे प्रश्नमुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. प्रक्षिक वाघमारे, डॉ. नितीन टिपले, पी.एल. शेंडे, सुखदेव मून, दामोदर सूर्यवंशी, लक्ष्मण करमनकर, प्रभाकर रामटेके आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर प्रमोदिनी साठे, परमानंद भारती यांच्या दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष शिवदास बेताल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचालन समितीचे कार्याध्यक्ष देवराव मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.