Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग

सुरक्षा व्यवस्थापनासंबंधी हॉटेल मालकांची परिषद
व्यापार प्रतिनिधी: मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात विदेशी पर्यटकांचे निवास असणाऱ्या तीन बडय़ा हॉटेल्सना लक्ष्य केले गेले. देशाची प्रतिष्ठा व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हॉटेलवर हल्ला करून आर्थिक नाडय़ा आवळण्याच्या दहशतवादी डावपेचांना प्रत्युत्तर म्हणून हॉटेल मालकांनी स्वत:हून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल अँड रेस्ट्रॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) च्या १५ व्या स्थानिक परिषदेत याच अनुषंगाने ठोस निर्णय अपेक्षित आहे.

अभ्युदय बँक निवडणुकीत ‘संस्थापक पॅनेल’च विजयी
व्यापार प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात प्रगतीचे नवनवे टप्पे गाठत चाललेल्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक या बहुराज्यीय शाखा विस्तार असलेल्या बँकेवर पुढील पाच वर्षांसाठी संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार व बँकेचे माजी अध्यक्ष श्री. सीताराम घनदाट यांच्या नेतृत्वाखालील ‘संस्थापक पॅनेल’च्या बाजूने स्पष्ट कौल मिळाला आहे. गुरुवार, ११ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. घोरपडे यांच्या देखरेखीत झालेल्या निवडणुकीत बँकेच्या सभासदांनी संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पारडय़ात भरभरून मते दिली.

‘सेरा’चा इटालियन कंपनी ‘नोव्हेल्लिनी’शी करार
व्यापार प्रतिनिधी : शॉवर एन्क्लोजर, इक्विपड् पॅनेल, स्टीम क्युबिकल्स आणि हायड्रो मसाज बाथ टब यासारख्या प्रख्यात ब्रॅण्डसाठी प्रसिद्ध असलेला आघाडीचा इटालियन प्रीमियम वेलनेस ब्रॅण्ड ‘नोव्हेल्लिनी’ भारतात दाखल झाला. वेलनेस रेंजमधील युरोपातील आघाडीचा ब्रॅण्ड ‘नोव्हेल्लिनी’ने आघाडीची बाथरूम सोल्युशन्स कंपनी ‘सेरा सॅनिटरीवेअर लिमिटेड’बरोबर भारतात आपली उत्पादने दाखल करण्यासाठी भागीदारी केली आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफची ‘सिक्युअर सेव्ह’ योजना
व्यापार प्रतिनिधी: आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफने ‘सिक्युअर सेव्ह’ गुंतवणूक योजना जाहीर केली आहे.‘सिक्युअर सेव्ह’ ही संपत्ती निर्माण करणारी एक नावीन्यपूर्ण गुंतवणूक योजना आहे. जी कालपरत्वे गुंतवणूकदाराच्या बचत मूल्यात वाढ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे, तसेच या योजनेत किमान मॅच्युरिटी रक्कम देण्याची हमीसुद्धा देण्यात आली आहे. युनिट संबंधित दुहेरी लाभामुळे ही योजना गुंतवणूकदारांस दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीची शक्ती प्रदान करते व शेअरबाजारातील घसरणी दरम्यानच्या नुकसानीची भीती घालवते.

ग्रामीण भागातील विपणनासाठी रिलायन्स कम्युनिकेशनचा ‘कृभको’शी करार
व्यापार प्रतिनिधी: कृषक भारती को ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी एकत्र येऊन कृभको रिलायन्स किसान लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची ६० टक्के मालकी ‘कृभको’कडे तर ४० टक्के मालकी ‘रिलायन्स’कडे राहणार आहे. ही संयुक्त कंपनी भारतातील टेलिफोन सेवांचा प्रसार वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्याधुनिक उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देईल.

व्यापार संक्षिप्त
मुंबईत एशियन मेटॅलर्जी प्रदर्शनाचे आयोजन

व्यापार प्रतिनिधी: ‘चांदेकर बिझनेस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या वतीने मुंबईत ११ ते १३ जून या कालावधीत ‘एशियन मेटॅलर्जी २००९’ हे सहावे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आशियातील फेरस आणि नॉन-फेरस मेटल्स आणि मिनरल इंडस्ट्रीशी निगडित तंत्रज्ञान, अवजारे, कच्चा माल आणि उत्पादने यांची माहिती देणारे ‘एशियन मेटॅलर्जी’ हे प्रदर्शन कंपनीतर्फे दर वर्षांआड भरविण्यात येते. आजघडीला आशियाई देशात स्टील, मेटल व मिनरल इंडस्ट्रीचा आलेख चढता आहे आणि पुढील पाच-सहा वर्षांमध्ये तो तसाच राहील, असा विश्वास संबंधित तज्ज्ञांना वाटतो आहे. इंडस्ट्रीशी संबंधित अनेक व्यावसायिक संगठने, व्यापारी केंद्रे, आशिया हे प्रगतिपथावरील व्यापारी केंद्र असल्याची खूण पटवीत आहेत. ‘एशियन मेटॅलर्जी २००९’ हे प्रदर्शन भारतीय उपखंड, चीन, साऊथ-ईस्ट आशिया, आखात आणि युरोपातील व्यापारी व उद्योजकांना आकर्षित करीत आहे. या क्षेत्रातील ‘तंत्रज्ञान व अवजारे पुरविणाऱ्या अग्रगण्य व्यावसायिक संघटनांची परिपूर्ण माहिती’ हे या वर्षांच्या प्रदर्शनाचे केंद्रस्थान असणार आहे. ही माहिती कंपनीचे संचालक ज्ञानेश चांदेकर यांनी दिली.

अ‍ॅव्हॉन कॉर्पोरेशनची नवी डिजिटल यंत्रे
व्यापार प्रतिनिधी : अव्हॉन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला आय.एस.ओ. ९००१ : २००० प्रमाणपत्र मिळाले असून वजन काटा उत्पादनातील ही अग्रणी कंपनी आहे. हिने डिजिटल वजन काटय़ाची नवी मॉडेल नुकतीच बाजारात आणली आहे. कंपनीने मुलांसाठी एपीडी- ८०१ डिजिटल ग्लास स्केल तयार केला असून याची किंमत ११९९ रुपये आहे. आकर्षक रंग आणि स्टायलिश कार्टून फिनिश यामुळे हे उपकरण लहान मुलांच्या पसंदीस उतरते. याच्यावर एलसीडी डिस्प्ले आहे. याची क्षमता १५० किलोची आहे. पॉवर कमी होणे किंवा जाणे स्वयंचलितपणे होते. लहान मुलांना वाढदिवसाला आयात ही चांगली भेट आहे. जॉगिंग पार्क, व्यायामशाळा आणि योग ही आता प्रत्येक भारतीयाची जीवनशैली झाली आहे. बहुतेक भारतीय घरांच्या शयनगृहात वजन काटा असतो. अ‍ॅव्हॉनने एपीडी- ८०३ मॉडेल बाजारात आणले असून याची किंमत १६९९ रुपये आहे. याच्यावर कोणाही व्यक्तीचे अचूक वजन मिळू शकते. मोठा एलसीडी, वीजेचा कमी वापर आणि साफ करण्यास सोपे असे हे उपकरण आहे.

होंडाची जागतिक गाडी ‘जॅझ’ भारतात
व्यापार प्रतिनिधी : भारतातील प्रीमियम गाडय़ांची अग्रगण्य उत्पादक कंपनी होंडा सिएल कार्स इंडियाने आज आपल्या सर्वात नवीन गाडी होंडा जॅझची सुरुवात केलेली आहे. भविष्यकालीन एअरोडायनॅमिक बाह्यभाग आणि आरामदायी आंतरिक भाग यामधील महत्तम संतुलनासह जॅझ ही आपल्या विभागाची संज्ञा करणारी गाडी असून या गाडीने अनेक पुरस्कार आणि जगभरात पुष्कळ नाव कमावलेले आहे. आपल्या डायनॅमिक स्टायलिंग, आरामदायी आंतरिक रचना, अनेकविध उपयोग आणि अप्रतिम प्रदर्शन यामुळे होंडा जॅझ ड्रायव्हिंग अनुभवामध्ये अधिक मौज आणि उत्साह प्रदान करते.

सिंडिकेट बँक आणि एसबीआय लाइफ यांच्यात सहकार्य
व्यापार प्रतिनिधी : या सहकार्य करारानुसार एसबीआय लाइफ सिंडिकेट बँकेच्या ज्या ग्राहकांनी इंडियन बँकर्स असोसिएशन (आयबीए)च्या विशेष योजनेखाली गृहकर्ज घेतली असतील अशा गृहकर्ज ग्राहकांना विमा संरक्षण देऊ केले जाणार आहे. ही विशेष योजना ३० जून २००९ पर्यंत अंमलात असेल आणि त्या योजनेनुसार १८ ते ५५ वर्षे वयोगटातील जे ग्राहक २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतील त्यांना विमा योजनेचे कवच विनामूल्य मिळणार आहे. या गृहकर्ज संरक्षणामध्ये प्रीमियमचा खर्च बँकेकडून उचलला जाणार असून त्यात कोणत्याही कागदपत्रांची गरज भासत नाही.

बॉम्बर्डियरतर्फे ‘मोव्हिया मेट्रो’
व्यापार प्रतिनिधी: बम्बार्डियर ट्रान्सपोर्टेशन तर्फे मोव्हिया मेट्रो ट्रेन भारतात सादर करण्यात आली आहे. याच उत्पादन कंपनीच्या वडोदरा येथील नवीन प्रकल्पात करण्यात आले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी ही ट्रेन अवघ्या २४ महिन्यात तयार करण्यात आली आहे. बम्बार्डियरचा नवीन प्रकल्प अत्याधुनिक असून या प्रकल्पामुळे दक्षिण पूर्व आशिया मधल्या गरजा पुरविण्यास मदत होणार आहे.