Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

अभ्युदय बँक निवडणुकीत ‘संस्थापक पॅनेल’च विजयी
व्यापार प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात प्रगतीचे नवनवे टप्पे गाठत चाललेल्या अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक या बहुराज्यीय शाखा विस्तार असलेल्या बँकेवर पुढील पाच वर्षांसाठी संचालक मंडळाच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार व बँकेचे माजी अध्यक्ष श्री. सीताराम घनदाट यांच्या नेतृत्वाखालील ‘संस्थापक पॅनेल’च्या बाजूने स्पष्ट कौल मिळाला आहे. गुरुवार, ११ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. घोरपडे यांच्या देखरेखीत झालेल्या निवडणुकीत बँकेच्या सभासदांनी संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पारडय़ात भरभरून मते दिली.
‘आपली बँक’ हे ब्रीद पुरेपूर निभावताना अभ्युदय बँक यापुढेही अशीच प्रगती करीत राहील आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय-श्रमिकांसाठी नवनवीन सेवा प्रस्तुत करेल, असा संकल्प श्री. सीताराम घनदाट यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. श्री. घनदाट म्हणाले की, ‘मुंबईतील गिरणगावात ४५ वर्षांपूर्वी रूजलेल्या इवल्याशा रोपटय़ातून आज वटवृक्ष साकारताना दिसत आहे.’’ बँकेच्या अलीकडच्या काळातील वेगवान प्रगतीत अभ्युदय बँकेच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाचे अमोल योगदान राहिले आहे. त्यांच्यावरील बँकेच्या कर्मचारी-अधिकारी आणि सभासदांच्या सार्थ विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असेही श्री. घनदाट यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
संस्थापक पॅनेलमधील सर्व उमेदवार, सर्वश्री सीताराम घनदाट, रघुराम शेट्टी, मारुती मेहेत्रे, संदीप घनदाट, नित्यानंद प्रभू, मोहन घनदाट, अच्युत कांडपिळे, हरिहर जयस्वार, जयंतीलाल जैन, मातरबा काणे, अशोक चाळके, जगजीवनदास एन. राय, विनोद शाह, अंबा पटेल आणि वामन नलभीमवार तसेच महिला उमेदवार श्रीमती रत्नमाल गोरडे व श्रीमती जे. सी. डिसिल्व्हा यांना या निवडणुकीत सभासदांनी बहुमताने विजयी केले आहे.