Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

‘सेरा’चा इटालियन कंपनी ‘नोव्हेल्लिनी’शी करार
व्यापार प्रतिनिधी : शॉवर एन्क्लोजर, इक्विपड् पॅनेल, स्टीम क्युबिकल्स आणि हायड्रो मसाज बाथ टब यासारख्या प्रख्यात ब्रॅण्डसाठी प्रसिद्ध असलेला आघाडीचा इटालियन प्रीमियम वेलनेस ब्रॅण्ड ‘नोव्हेल्लिनी’ भारतात दाखल झाला. वेलनेस रेंजमधील युरोपातील आघाडीचा ब्रॅण्ड ‘नोव्हेल्लिनी’ने आघाडीची बाथरूम सोल्युशन्स कंपनी ‘सेरा सॅनिटरीवेअर लिमिटेड’बरोबर भारतात आपली उत्पादने दाखल करण्यासाठी भागीदारी केली आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ‘नोव्हेल्लिनी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमालक मार्को नोव्हेल्लिनी म्हणाले की, ‘सेरा’ची प्रीमियम ब्रॅण्ड प्रतिमा, रिटेल क्षेत्रात तिचे खोलवर पोहोचलेले जाळे आणि तयार विपणन पायाभूत सुविधा लक्षात घेऊन ‘नोव्हेल्लिनी’ने तिची भारतीय भागीदार म्हणून निवड केली आहे.
‘सेरा’चे कार्यकारी संचालक विदुष सोमाणी म्हणाले की, भारतात वेलनेस उत्पादनांना असलेली मागणी वाढत आहे आणि या वाढत्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठीच सेराने ‘नोव्हेल्लिनी’शी सहकार्य करार केला आहे. ‘सेरा’ विपणन क्षेत्रातील आपल्या भक्कम पायाचा तसेच ‘नोव्हेल्लिनी’च्या प्रीमियम दर्जाचा वापर करणार आहे. ‘दोन्ही ब्रॅण्ड्स त्यामुळे एकमेकांना सुयोग्य असेच आहेत’, असेही सोमाणी यांनी म्हटले.
‘नोव्हेल्लिनी’चे निर्यात व्यवस्थापक जिओवन्नी ओरलॅन्डी यांनी संपूर्ण युरोपमध्ये आपल्या विस्तार योजनेचे नेतृत्व केल्यावर आता आशियाई आणि अमेरिकन बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत जागतिक कक्षा रुंदावत आहेत.
‘नोव्हेल्लिनी’ची रेंज सेरा बाथ स्टुडिओमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आली असून भारतभरातील सेराची डिस्प्ले केंद्रे तसेच काही ठराविक प्रीमियम शोरूम्समध्येही उत्पादने पाहायला मिळतील.