Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफची ‘सिक्युअर सेव्ह’ योजना
व्यापार प्रतिनिधी: आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफने ‘सिक्युअर सेव्ह’ गुंतवणूक योजना जाहीर केली आहे.‘सिक्युअर सेव्ह’ ही संपत्ती निर्माण करणारी एक नावीन्यपूर्ण गुंतवणूक योजना आहे. जी कालपरत्वे गुंतवणूकदाराच्या बचत मूल्यात वाढ करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे, तसेच या योजनेत किमान मॅच्युरिटी रक्कम देण्याची हमीसुद्धा देण्यात आली आहे. युनिट संबंधित दुहेरी लाभामुळे ही योजना गुंतवणूकदारांस दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीची शक्ती प्रदान करते व शेअरबाजारातील घसरणी दरम्यानच्या नुकसानीची भीती घालवते. ‘सिक्युअर सेव्ह’ योजनेत प्रीमिअम माध्यमातून भरलेल्या गुंतवणुकीच्या १५० टक्के किमान लाभ देण्याची हमी देण्यात आली आहे. दीर्घकालीन विमा संरक्षण देतानाच प्रीमिअम भरण्याचा मर्यादित काळ हा ‘सिक्युअर सेव्ह’ विमा पॉलिसीचा आणखी एक फायदा आहे. ही माहिती आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफच्या उत्पादन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रणव मिश्रा यांनी दिली. ते म्हणाले की, अल्पकाळासाठी केलेली समभाग गुंतवणूक हमखास संवेदनशील असते, हा आमचा अनुभव आहे. पण प्रदीर्घ काळात समभाग गुंतवणुकीत लाभ मिळवून देण्याची जरूर क्षमता असते. गुंतवणूकदारांना समभागात गुंतवणूक करायची असते, पण बाजारातील अनिश्चिततेमुळे ते कचरत असतात. त्यामुळे तोटय़ाची जोखीम टाळून सुरक्षा व वृद्धी असे दोन्ही लाभ हमखास देणारी विमा पॉलिसी म्हणून ‘सिक्युअर सेव्ह’कडे पाहता येईल.
‘सिक्युअर सेव्ह’ योजनेत प्रवेशासाठी किमान व कमाल वय अनुक्रमे १८-४५ वर्षे असून, कमाल मॅच्युरिटी वय ६५ वर्षे आहे. पॉलिसीची मुदत १०, १५ आणि २० वर्षे यापैकी काहीही असू शकेल. किमान प्रीमिअम (वार्षिक हप्ता) १० वर्षे मुदतीसाठी दरसाल रु. २० हजार; १५ व २० वर्षे मुदतीसाठी वार्षिक रु. १५ हजार इतका असेल, तर सर्व मुदतींसाठी कमाल प्रीमिअम (हप्ता) वार्षिक रु. ३५००० इतका असेल.