Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

व्यापार - उद्योग
(सविस्तर वृत्त)

ग्रामीण भागातील विपणनासाठी रिलायन्स कम्युनिकेशनचा ‘कृभको’शी करार
व्यापार प्रतिनिधी: कृषक भारती को ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी एकत्र येऊन कृभको रिलायन्स किसान लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीची ६० टक्के मालकी ‘कृभको’कडे तर ४० टक्के मालकी ‘रिलायन्स’कडे राहणार आहे.
ही संयुक्त कंपनी भारतातील टेलिफोन सेवांचा प्रसार वेगाने व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्याधुनिक उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देईल.
भारताच्या शहरी भागातील ग्राहकांना मिळणारी सर्व उत्पादने आणि सेवा ग्रामीण भागातील ग्राहकांना मिळवून देण्यात कृभको रिलायन्स प्रयत्न करणार आहे. ग्रामीण भागातील सहकारी संस्था भरभराटीला आलेली व्यापारी केंद्रे म्हणून विकसित व्हाव्या हे कृभकोचे उद्दिष्ट आहे.’’ असे कृभको चे व्यवस्थापकीय संचालक बी. डी. सिन्हा यांनी सांगितले.
कृभकोची देशभर पसरलेली २५००० संस्थांची ताकद, तिच्याशी संलग्न ६३०० सदस्य सहकारी संस्था आणि ६० कृषी सेवा केंद्रे या भक्कम आधारावर ही संयुक्त कंपनी एक नावीन्यपूर्ण विक्री प्रणाली उभी करून देशातील ७२ टक्के लोकांपर्यंत पोहोचेल. आपल्या या विक्री प्रणालीलारे, देशाच्या शहरी भागातील लोकांना मिळणारी अत्याधुनिक टेलिकॉम आणि इतर उत्पादने आणि सेवा ग्रामीण भागातही उपलब्ध करून ही कंपनी शहरी आणि ग्रामीण जीवनमानातील तफावत दूर करण्याच्या कामी हातभार लावणार आहे.