Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मूव्ही लव्हर्स आर इन्व्हायटेड!
काल आमच्या ग्रुपमध्ये एक छोटंसं भांडण झालं. विषय होता- मल्टिप्लेक्सचा वाद. खरं तर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहणारा आमचा कंपू. या सुट्टीत ५-६ चित्रपट पाहायचे ठरले होते. पण मल्टिप्लेक्सच्या वादामुळे आमचा पार खोळंबा झाला. त्यामुळे असे तात्त्विक वाद घालण्यापलीकडे पर्यायच उरलेला नव्हता. आमची ही खडाजंगी चालू असतानाच मोबाइलवर एक एसएमएस आला. ‘गोमोलो प्र्रेझेण्टस केस पेपर ऑन मुव्ही व्ह्य़ुइंग बिहेवियर ऑफ इंडियन यूथ’ चित्रपट प्रेमींसाठी गोमोलो ही वेबसाइट लाँच झाली आहे. हा मेसेज वाचला आणि आम्ही धाडधाड इंटरनेटवर उडय़ा टाकल्या. (चित्रपटाची तहान वेबसाइटवर..

 

दुसरं काय!) या वेबसाइटसाठी आजची तरुण पिढी कोणते चित्रपट पाहते? का आणि कसे पाहते याबाबत एक सव्‍‌र्हे केला गेला. त्यातील काही मजेशीर निष्कर्ष वाचायला तुम्हालाही आवडतील. १) चित्रपट पाहणाऱ्यांपैकी ४१ टक्के तरुण चित्रपटाच्या दर्जाचा विचार करतात. ३८ टक्के तिकिटांच्या दराचा तर ३६ टक्के शोच्या वेळेचा. २) चित्रपटाविषयी माहिती देणारे माध्यम म्हणून वृत्तपत्रे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अर्थात पहिला क्रमांक लागतो तो दूरदर्शनचा. ३) चित्रपटाची निवड ८७ टक्के तरुण हे प्रमुख भूमिका करणाऱ्या कलावंतांवरून करतात. ८० टक्के रसिक चित्रपटाची कथा जाणून घेतात. ५८ टक्के जणांवर चित्रपट संगीताचा प्रभाव आढळून येतो, तर ३५ टक्के तरुण बॅनरला महत्त्व देतात. ४) आठवडय़ात एक तरी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या अंदाजे ५१ टक्के आहे, तर दररोज एक तरी चित्रपट पाहणाऱ्यांचे प्रमाण ८ टक्के आहे. ५) चित्रपटापुढे इतर सर्व गोष्टींना गौण मानणाऱ्या तरुणांची संख्या ५ टक्के आहे, ५८ टक्के तरुण नियमितपणे चित्रपट पाहतात, तर ३५ टक्के लोकांना चित्रपट पाहायला आवडतात. ६) या सर्वेक्षणातून पुढे आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ८० टक्के तरुणांची पायरेटेड सीडींना पसंती आहे.
काय मित्रांनो या सर्वात आपलंच प्रतिबिंब दिसतंय का? मग नक्की या वेबसाइटला भेट द्या, गो मूव्ही लव्हर्स!
कॅम्पस मूड टीम