Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

ऑफबिट कोर्सेस
२२५ प्रकारचे कोर्सेस.. चर्चगेट- सांताक्रूझ, पुणे, अहमदाबाद आदी ठिकाणी असलेल्या शाखा.. अन् आठ-नऊ हजार विद्यार्थिनी.. ही विद्यार्थिनींची संख्या आहे ती श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच एसएनडीटीमधील. १९१६ पासून आजपर्यंत या युनिव्हर्सिटीमध्ये अनेक अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत. ज्या मुलींना वा स्त्रियांना काही निराळं करायचं असतं त्यांच्यासाठी एसएनडीटी मार्गदर्शक ठरते. आज कॅम्पस मूड आपल्यासाठी घेऊन आलंय अशाच काही हटके कोर्सेसची माहिती. ‘मास्टर ऑफ आर्टस् इन नॉन- फॉर्मल एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ हा ग्रॅज्युएशन नंतर केला जाणारा कोर्स मुलींसाठी एक नवी संधी घेऊन आलाय.

मूव्ही लव्हर्स आर इन्व्हायटेड!
काल आमच्या ग्रुपमध्ये एक छोटंसं भांडण झालं. विषय होता- मल्टिप्लेक्सचा वाद. खरं तर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहणारा आमचा कंपू. या सुट्टीत ५-६ चित्रपट पाहायचे ठरले होते. पण मल्टिप्लेक्सच्या वादामुळे आमचा पार खोळंबा झाला. त्यामुळे असे तात्त्विक वाद घालण्यापलीकडे पर्यायच उरलेला नव्हता. आमची ही खडाजंगी चालू असतानाच मोबाइलवर एक एसएमएस आला. ‘गोमोलो प्र्रेझेण्टस केस पेपर ऑन मुव्ही व्ह्य़ुइंग बिहेवियर ऑफ इंडियन यूथ’ चित्रपट प्रेमींसाठी गोमोलो ही वेबसाइट लाँच झाली आहे.

अ‍ॅड‘मिशन’ : रंगीत तालीम
मित्रांनो, सध्या चर्चेत असलेली ऑनलाइन अ‍ॅडमिशनची वेबसाइट सुरू झाली आहे. त्यावर ऑनलाइन फॉर्म भरण्याचा सराव करता येणार आहे.
१) कॉम्प्युटरमधील इंटरनेटच्या अ‍ॅड्रेस बारवर टाइप करा. http://fyjc.org.in/mumbai
२) हे संकेतस्थळ उघडताच तुम्हाला ११ वी प्रवेश प्रक्रिया, मुंबई विभागाचे होम पेज दिसेल.
३) या होम पेजच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात mock Test site असे फ्लॅश होताना दिसेल. त्यावर क्लिक् करा. त्यानंतर तुम्हाला हे संकेतस्थळ ‘फक्त फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी’ असल्याचे सांगण्यात येईल.

आमचंही ऐका!
दहावी, बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर पहिला प्रश्न पडतो तो पुढे करायचं काय? करिअर म्हणून काय निवडायचं? काही वेळा पालक आणि विद्यार्थी यांच्यात करिअरच्या बाबतीत सहमत दिसते, पण काही वेळा तसं दिसून येत नाही. माझ्या मुलानं वा मुलीने मी सांगतो तेच करावं, असा काही पालकांचा हट्ट असतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पालकांच्या इच्छेखातर त्याचं म्हणणं ऐकावं लागतं. पण अशा तडजोडीमुळे मुलावर त्यांच्या अभ्यासावर, एकंदर वागणुकीवर परिणाम होऊ लागतो.

दिल से..
प्रिय मिहीर,
हाय.. माझं कॉलेज सुरू झालंय. मी चक्क दिवसभरातल्या एकूण एक लेक्चर्सना बसायला लागले आहे. सॉलिड नाऽऽ महत्त्वाचं म्हणजे, मला अभ्यास करावासा वाटायला लागलाय. आपणहून पुस्तक उघडून बसावंसं वाटायला लागलंय. अर्थात त्यामुळे ‘घरची आघाडी’ आनंदात आहे हे वेगळं सांगायला नकोच.. बाय द वे. फ्रेंच ओपनमध्ये शेवटी मी म्हटल्याप्रमाणे रॉजर फेडररच जिंकला. तुझा नादाल हरलाय आणि येस्स, मी बेट जिंकले आहे.. तेव्हा, मला पार्टी द्यायला तरी लवकर परत ये.. ट्वेन्टी ट्वेन्टीबद्दल तूसुद्धा इतका क्रेझी आहेस हे मला खरंच माहीत नव्हतं..

रेडी टू राइड..
सुझुकी जी. एस. एक्स. आर. १०००, यामाहा आर वन किंवा हर्ली डेव्हीडसनच्या सुपर बाईकवर बसून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावे, अशी प्रत्येक तरुणाच्या मनातली इच्छा असते. या सुपर बाईक्सची क्रेझ तरुणांमध्ये फारच वाढली आहे. पण या बाईक्सच्या किमती लाखांच्या घरात असतात. त्यामुळे या अशा सुपर बाईक्सचं पोस्टरच स्टडी रूममध्ये लावणे परवडते. याला आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे बाईकचं मॉडिफिकेशन करणे.
मॉडिफिकेशन प्रमुखत: परफॉर्मन्स आणि लूक या दोन बदलांकरिता करण्यात येते. साध्या बाईकला सुपर बाईकमध्ये परावर्तित करण्याकरिता ब्रॅन्डेड सुपर बाईकचे डमी पार्ट बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही स्वत: डिझाइन तयार करून बाईक मॉडिफाईड करून घेऊ शकता.
मॉडिफिकेशनमध्ये प्रमुखत: फायबर ग्लास आणि रेनफोर्ड प्लास्टिक यांचा वापर केला जातो. हॅन्डलबारवर क्लिप लावणे, स्टायलिश ग्राफिक्स, स्लोगन्सचे स्टीकर, मॅगऑली व्हील्स, रेयर व्हय़ू मिरर, डिझाईन सीट, पेट्रोल टॅन्कना विशिष्ट शेप देणे यासारखे मॉडिफिकेशन्स करण्याचे प्रमाण वाढत आहे. याकरिता २५०० रुपयांपासून तुमच्या आवाक्यापर्यंतचा खर्च तुम्ही करू शकता. मुंबई, पुणे येथे बाईक मॉडिफिकेशन करून देणारी गॅरेजेस आणि कंपन्या उपलब्ध आहेत. सो थिंक फॉर ग्रेट चॉईस अ‍ॅण्ड रेडी फॉर राईड..
कॅम्पस मूड टीम