Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक

‘डॉक्टर’ पद्मसिंह पाटील यांचा कोठडीतील अनोखा ‘फिटनेस फंडा’!
नवी मुंबई, १५ नोव्हेंबर/प्रतिनिधी

तब्येतीची वेगवेगळी कारणे पुढे करून अटकेच्या अगदी पहिल्या दिवसापासून सीबीआयला हैराण करुन सोडणारे डॉ.पद्मसिंह पाटील कोठडीतही फीट रहाण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. या ‘पैलवान गडय़ा’च्या या ‘फिटनेस फंडय़ा’मुळे सीबीडी पोलिसांचे मात्र तोंडचे पाणी पळाले आहे.कानात आयपॉडचे इअर फोन, टी शर्ट, कमरेला पाउच, पायात स्पोर्ट्स शूज अशा राजेशाही थाटात डॉक्टर दररोज सकाळी सीबीआयच्या बंदोबस्तात बेलापूर येथील सीजीओ कॉम्प्लेक्स येथे तासभर रपेट मारतात.

शायनी आहुजाला तीन दिवसांची पोलीस कोठडी
मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप

मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

‘हजारो ख्वाईशें एैसी’ आणि ‘गँगस्टर’ या चित्रपटांमुळे प्रसिद्धीस आलेला अभिनेता शायनी आहुजा याला ओशिवरा पोलिसांनी मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली रविवारी अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आहुजाच्या मोलकरणीने ओशिवरा पोलिसांकडे आहुजाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते.

शिवसेनेच्या आंदोलनामुळे घोडबंदर रोड ‘जाम’
जनतेचे हाल , विद्यार्थ्यांनाही फटका
ठाणे, १५ जून /प्रतिनिधी

शासनाने मंजूर केलेले कापूरबावडी उड्डाणपुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यासाठी शिवसेनेने आज माजिवडा नाक्यावर रास्ता रोको, ‘भीक मांगो’ आंदोलन करीत भूमिपूजनाचा श्रीफळ वाढविला. तासभर झालेल्या आंदोलनामुळे अनेक विद्यार्थ्यांवर पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारण्याचा प्रसंग ओढवला, तर प्रवाशांना वाहनांमध्ये बसून उन्हाचे चटके सोसावे लागले. घोडबंदर रोडवरील कापूरबावडी नाक्यावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातामुळे राज्य शासनाने कापूरबावडी नाक्यासह चार उड्डाणपुलांना मंजुरी दिली.

ये दोस्ती हम नही तोडेंगे!
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

बरोबर ५० वर्षापूर्वी जेव्हा कुमार बाळ धुरी, कुमार सुरेंद्र कुलकर्णी आणि कुमार वसंत सहस्रबुद्धे यांनी दादरच्या छबिलदास शाळेत आठवी ‘एच’च्या वर्गात प्रथम प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या अंगावर होता शाळेचा गणवेश, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात होतं दप्तर. आज पन्नास वर्षानंतरही त्यांनी जेव्हा शाळेत पुन्हा प्रवेश केला त्यावेळीही त्यांच्या अंगावर होता गणवेश, हातात छत्री परंतु दुसऱ्या हातात दप्तराच्याऐवजी होता पुष्पगुच्छ आणि पेढय़ाचा पुडा.

‘टोल’मोल के बोल..नाक्यांवरील अडवणुकीवर आमदार बिथरले!
मुंबई, १५ जून/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील टोल नाक्यांवर मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी दिसली की वसुलीकरिता पुढे होणारे हात आपसुक सलामी ठोकतात.. पण लाल दिवा काही सर्वाच्या नशिबात नसतो. मग आमदारांना टोल नाक्यावर अपमान, अवहेलना यांचा सामना करावा लागतो.. आमदारांकडून टोल वसूल करायचा नाही याची नाक्यावरील अशिक्षित कर्मचाऱ्यांना सूतराम कल्पना नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना समज द्या, कारवाई करा अशा मागण्या विधान परिषदेत आज सर्वपक्षीय आमदारांनी केल्या.

‘२६/११’ वर प्रभावी सुरक्षा पर्याय ‘२६११’ चा!
नीरज पंडित
मुंबई, १५ जून

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरातील शासकीय आणि काही खासगी यंत्रणा कार्यरत झाल्या असून सुरक्षिततेचे अनेक पर्याय समोर आले. अशाच प्रकारची ‘२६११’ही सुरक्षा हेल्पलाईन जेष्ठ शास्त्रज्ञ दिनकर बोर्डे यांनी तयार केली आहे. या यंत्रणेचे प्रश्नत्यक्षिक स्वत: बोर्डे येत्या गुरुवारी (१८ जून) मंत्रालयात करून दाखविणार आहेत.

शिवसेनेतील संघटनात्मक बदलांना प्रश्नरंभ; दुधवडकर, गुजर विभागप्रमुखपदावरून दूर
मुंबई, १५ जून/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदलास प्रश्नरंभ केला असून कारवाईचा पहिला बडगा दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख अरुण दुधवडकर व ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख दत्ताराम गुजर यांच्यावर उगारण्यात आला आहे. या दोघांना पदांवरून दूर करून त्यांच्याजागी अनुक्रमे पांडुरंग सकपाळ व सुधीर मोरे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने भारतीय जनता पक्षाकडून भांडून पदरात पाडून घेतला. या मतदारसंघातून भाजपच्या जयवंतीबेन मेहता निवडणूक लढवित होत्या तर गोपीनाथ मुंडे यांना पूनम महाजन यांच्याकरिता हा मतदारसंघ हवा होता. शिवसेनेचे मुंबईतील एकमेव खासदार मोहन रावले यांच्याकरिता शिवसेनेने भाजपशी संघर्ष केला. परंतु या मतदारसंघात रावले पराभूत झाले. इतकेच नव्हे तर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या पराभवाची नैतिक जबाबदारी अरुण दुधवडकर यांची असल्याने त्यांना पदावरून दूर केले जाणार असून त्यांच्या जागी माजी उपविभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांची नियुक्ती केली जाणार आहे. ईशान्य मुंबईत मनसेचा जोर वाढला असून तेथेही युतीला फटका बसला आहे.

कामा रुग्णालयात महिला व बाल कॅन्सर विभाग सुरु होणार
मुंबई, १५ जून / खास प्रतिनिधी

टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा प्रचंड ताण लक्षात घेता कामा रुग्णालयात महिला आणि बाल कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठीचा विभाग लवकरच कार्यरत होईल, तसेच राज्याच्या प्रत्येक विभागांत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज विधान परिषदेत दिली. शेट्टी यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांनी कामा रुग्णालयातील विभागासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून येथे महिला व बाल रुग्णांवर केमोथेरपी तसेच अन्य उपचार करण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात येईल.