Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘डॉक्टर’ पद्मसिंह पाटील यांचा कोठडीतील अनोखा ‘फिटनेस फंडा’!
नवी मुंबई, १५ नोव्हेंबर/प्रतिनिधी

तब्येतीची वेगवेगळी कारणे पुढे करून अटकेच्या अगदी पहिल्या दिवसापासून सीबीआयला हैराण करुन सोडणारे डॉ.पद्मसिंह पाटील कोठडीतही फीट रहाण्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. या

 

‘पैलवान गडय़ा’च्या या ‘फिटनेस फंडय़ा’मुळे सीबीडी पोलिसांचे मात्र तोंडचे पाणी पळाले आहे.
कानात आयपॉडचे इअर फोन, टी शर्ट, कमरेला पाउच, पायात स्पोर्ट्स शूज अशा राजेशाही थाटात डॉक्टर दररोज सकाळी सीबीआयच्या बंदोबस्तात बेलापूर येथील सीजीओ कॉम्प्लेक्स येथे तासभर रपेट मारतात. खुनाचा आरोप असतानाही डॉक्टरांची पोलीस कोठडीतून बाहेर काढून मोकळ्या हवेत फेरफटका मारण्याची हौस भागविली जाते.
विशेष म्हणजे, डॉक्टरांचे हे ‘फिटनेस रिजीम’ पाळण्यासाठी सीबीडी पोलिसांच्या गार्डनाही भल्या पहाटे त्यांच्यासोबत रपेट मारावी लागत असून यासंदर्भात सीबीआयच्या वर्तुळात मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.