Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘२६/११’ वर प्रभावी सुरक्षा पर्याय ‘२६११’ चा!
नीरज पंडित
मुंबई, १५ जून

२६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरातील शासकीय आणि काही खासगी यंत्रणा कार्यरत झाल्या असून सुरक्षिततेचे अनेक पर्याय समोर आले. अशाच प्रकारची

 

‘२६११’ही सुरक्षा हेल्पलाईन जेष्ठ शास्त्रज्ञ दिनकर बोर्डे यांनी तयार केली आहे. या यंत्रणेचे प्रश्नत्यक्षिक स्वत: बोर्डे येत्या गुरुवारी (१८ जून) मंत्रालयात करून दाखविणार आहेत.
बोर्डे यांनी तयार केलेली ‘२६११’ ही हेल्पलाइन म्हणजे देशभरात तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत असाल तर या हेल्पलाइनच्या आधारे तुम्ही तुमची सुटका करुन घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही संशयित हालचाली दिसल्यास त्याही तुम्ही या हेल्पलाइनवर कळवू शकतात. या हेल्पलाइनवर येणारा प्रत्येक कॉल प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून परिस्थितीनुसार स्थानिक पातळीवरील वैद्यकीय, अग्निशमन, पोलीस आदी विभागांतील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. वेळ पडल्यास या मार्फत येणारा संदेश देशातील अतिमहत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांकडे पोहचविण्याची व्यवस्थाही या हेल्पलाइनमध्ये आहे.
‘२६११’ हा क्रमांक दूरध्वनी, मोबाइल, टेलिमॅटिक्स आणि व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रश्नेटोकॉलवरून डायल करता येणे शक्य होणार आहे. या हेल्पलाइनवर येणारा प्रत्येक कॉल टॅप करण्यात येतो. जीपीएसच्या आणि लोकेशन बेस्ड सर्विस (एल.बी. एस.)च्या सहाय्याने या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींचे अथवा त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाचा आढावा घेता येणे शक्य होणार आहे. यामुळे आपल्याला अतिप्रसंगाच्या ठिकाणी वेळीच सेवा पुरविता येणे शक्य होणार आहे.
ही यंत्रणा कार्यरत व्हावी यासाठी बोर्डे २००१ पासून प्रयत्नशील आहेत. २००१ मध्ये बोर्डे यांनी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला होता. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील गृहखात्यांशीही पत्रव्यवहार केला. पण सर्व ठिकाणी त्यांची यंत्रणा लालफितीत अडकली. देशाच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त असलेली ही हेल्पलाइन वेळीच सुरु करावी अशी मागणी बोर्डे यांनी केली आहे. या माध्यमातून आपण सुरक्षेचे अनेक प्रश्न वेळीच आणि सहज सोडवू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ही यंत्रणा अद्याप कागदावरच असली तरी शासनाच्या सहकार्याशिवाय त्याचे प्रश्नत्यक्षिक करणेही कठीण आहे, यामुळे या यंत्रणेची अमंलबजाणी लवकरात लवकर करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.