Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

राणी बागेच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई प्रश्नणीसंग्रहालयाच्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या विस्तारीकरणाची योजना पालिकेने आखली असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रश्नणीसंग्रहालय इथे बांधले जाणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज या प्रश्नणीसंग्रहालयाला भेट देऊन

 

विस्तारीकरणाच्या आराखडय़ाची माहिती घेतली. नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रश्नणीसंग्रहालयात परदेशी उपकरणे आणि प्रश्नणीही परदेशातून आयात करण्यात येणार आहेत. या विस्तारीकरणासाठी एकही झाड तोडले जाणार नाही, असा दावा ठाकरे यांनी केला, मात्र ‘सेव्ह राणीबाग’ या संस्थेने विस्तारीकरणाच्या प्रकल्पावरच आक्षेप घेतला आहे.
नव्याने बांधण्यात येणारे संग्रहालय बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. ११ जून रोजी हेरिटेज कमिटीनेही परवानगी दिली आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी यावेळी सांगितले. नवीन संग्रहालय कसे असेल या विषयी राजीव यांनी सादरीकरण केले. या सादरीकरणानुसार या प्रश्नणीसंग्रहालयात सर्व आधुनिक सुविधा असतील.
सध्याचे प्रश्नणी सांभाळले जातीलच. शिवाय परदेशातून नवीन प्रश्नणी आयात केले जाणार आहेत. यात आस्ट्रेलियाच्या कांगारूंचाही समावेश आहे. तसेच प्रश्नण्यांना मोकळ्या हवेत जगता यावे आणि लोकांनाही त्यांचे नीट दर्शन व्हावे, अशी रचना या प्रश्नणीसंग्रहालयाची असणार आहे. आफ्रिकेतील प्रश्नणीसंग्रहालयाप्रमाणे हे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. तीन टप्प्यात हे विस्तारीकरण करण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात प्रश्नणीसंग्रहालय बांधण्यात येणार आहे.
सध्या प्रश्नणीसंग्रहालयात हॉटेल नाही, मात्र नव्या रचनेत फूड प्लाझा बांधण्यात येणार आहे. जलचर प्रश्नण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असून काचेच्या आड त्यांना पाण्यात ठेवण्यात येणार आहे. काचेमधूनच अनेक प्रश्नण्यांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सादरीकरण बघितल्यावर ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आणि मुंबईचे हे एक प्रमुख आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी एकही झाड तोडावे लागणार नाही, कारण झाडाचे संरक्षण करूनच बांधकाम केले जाणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. परदेशी प्रश्नणी इथे जगतील का, असे विचारले असता, परदेशी व्यक्ती देशाचा कारभार करीत आहे, तर परदेशी प्रश्नणी इथे का नाही टिकणार, असा अजब सवाल ठाकरे यांनी केला. या वेळी पालिका आयुक्त जयराज फाटक आणि शिवसेनेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते. पालिका प्रशासन आणि ठाकरे यांनी एकही झाड तोडणार नसल्याचा दावा केला असला तरी ‘सेव्ह राणीबाग’ या संस्थेला मात्र या दावा फोल वाटत आहे. पालिकेने आधी आपला मास्टर प्लॉन जाहीर करावा, अशी मागणी या संस्थेच्या रैनी व्यास यांनी केली आहे. हेरिटेज कमिटीची परवानगीही काही अटीवर देण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.