Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘टीस’च्या स्त्रीविषयक समस्यांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन
मुंबई, १५ जून / प्रतिनिधी

‘ वुमेन स्टडीज्’ हा विषय शिकण्यासाठी देश-परदेशातून विद्यार्थी आले आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. हा विषय शिकणे सोपे नाही. ‘वुमेन स्टडीज्’सारखा विषय केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित असू शकत नाही तर यातून आपल्याला एक वेगळा दृष्टीकोन मिळू शकतो’, असे

 

प्रतिपादन प्रश्न. पुष्पा भावे यांनी केले.
टाटा समाज विज्ञान संस्थेने (टीस) यंदापासून ‘ एम.ए. इन वुमेन स्टडीज्’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. स्त्री चळवळ सुरु झाली तेव्हा संशोधनाचे महत्त्व आजच्या एवढे नव्हते. पण आता स्त्री चळवळ आणि टीआयएसएस सारख्या संस्था एकमेकांच्या सहकार्याने कार्य करु शकतील, अशी आशा स्त्री-मुक्ती चळवळीच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर यांनी व्यक्त केली.
प्रश्न. सुमा चिटणीस यावेळी म्हणाल्या की, स्वप्न प्रत्यक्षात उतरायला बराच काळ जावा लागतो. अशा प्रकारे स्त्रियांच्या प्रश्नांवर आधारित अभ्यासक्रम असावा हे अनेक वर्षापासूनचे आमचे स्वप्न आज पूर्ण झाले.
भारतीय समाजातील महिलांची भूमिका बदलत आली आहे. महिलांच्या परिस्थितीचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. आजही निर्णय प्रक्रियेत महिलांची संख्या कमीच आढळून येते. समाजाच्या तळागाळातील थरातही याबद्दल काम होण्याची गरज आहे, असे प्रश्न. अ‍ॅल्मिटी देसाई यांनी सांगितले. प्रश्न. मैत्रेयीकृष्णा राज म्हणाल्या की, स्त्रियांविषयक अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे अनेक ठिकाणी आढळून येते. हा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी स्त्री विषयक अभ्यासाबरोबरच पुरुषप्रधान मानसिकतेचाही अभ्यास व्हायला हवा. टाटा समाज विज्ञान संस्थेच्या स्त्री अभ्यासकेंद्राच्या प्रमुख छाया दातार यांचा आज निरोप समारंभ होता. त्यानिमित्ताने बोलताना, त्यांनी स्त्री-चळवळीतील एक कार्यकर्ती ते टीआयएसएस या संशोधन केंद्रातील प्रश्नध्यापक हा प्रवास कसा झाला त्याचा आढावा घेतला. महिलाविषयक अभ्यासासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे ही एक स्वप्नपूर्ती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. पाणी प्रश्नावर केलेले काम व त्यावेळी आलेले अनुभवही त्यांनी सांगितले. तुळजापूर येथे टीआयएसएसचे ग्रामीण भागातील संशोधन केंद्र स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. या अभ्यासक्रमासाठी सध्या तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या दिल्ली, मणिपूर, अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली. ‘अफगाणिस्तानात तालीबानी राजवटीत महिलांची परिस्थिती जवळून बघितली होती. त्यामुळेच महिलांविषयक अभ्यासाबद्दल रुची निर्माण झाली’, असे अफगाणिस्तानातून आलेल्या मोहम्मद हबीबी याने सांगितले तर स्त्री चळवळ ही केवळ स्त्रियांपुरती मर्यादित नसून ती माणुसकीची चळवळ असल्याने आपण या अभ्यासक्रमाची निवड केल्याचे बंगलोरच्या रोहनने सांगितले. ‘वुमन स्टडीज्’ या नावाऐवजी ‘जेंडर स्टडीज्’ असे नाव या अभ्यासक्रमाला का नाही दिले असा प्रश्न विचारुन दिल्लीच्या गीताने उपस्थित सर्व तरुणांकडून दाद मिळवली.