Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

तरुणांच्या व्यसनमुक्तीनेच सशक्त भारत संभव -दराडे
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

भारतातील तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून त्यांना व्यसनमुक्त केल्यास सशक्त भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी केले. लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे आदासा येथे आयोजित करण्यात आलेल्या मधुमेह, मोतीबिंदू व तंबाखु विरोधी अभियानाच्या उद्घाटनपर भाषणाच्यावेळी ते बोलत होते.
शासनाच्या माध्यमातून लता मंगेशकर हॉस्पिटलला अशा उपक्रमासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी आशीष देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा व गाव व्यसन मुक्त करावे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत रुग्णसेवा पोहोचवणे हा उद्देश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, एन.के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुब्रजित दासगुप्ता, अ‍ॅड. शिशिर बानाईत, जयंत मुलमुले, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे, दिलीप धोटे उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर तंबाखुजन्य वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी भाऊसाहेब भोगे, देविदास डोईफोडे, डॉ. संजय कुमार, डॉ. विजय धोटे, डॉ. राजीव पोतदार, दादाराव मंगळे, सोनबाजी मुसळे उपस्थित होते.