Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या बदल्या
नागपूर,१५ जून/ प्रतिनिधी

 

राज्यातील भूजल सर्वेक्षण खात्यातील ३१ वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अमरावतीच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती टी.एस. देशमुख यांची जिल्हा परिषद अकोला येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात, तर जलगाव जिल्हा परिषदेचे पी.व्ही कथने यांची बुलढाणा जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली आहे. गडचिरोली येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक पी.एन. लांजेवार यांची यवतमाळ येथे तर वाशीमच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती हीमा जोशी यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे. हे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते, हे येथे उल्लेखनीय.
चंद्रपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक तरुण पाटील हे नागपूर भूजल सर्वेक्षण विभागाचे नवे उपसंचालक असतील. नांदेड येथील ए.डी. शहाणे यांनी भंडारा जिल्हा परिषदेत तर रायगड येथील एस.एस. बागडे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे. रायगडचे एस.एस. नाही यांना बुलढाणा येथे पाठविण्यात आले असून भूजल सर्वेक्षण विभाग नासिकचे उपसंचालक सी.के. उके यांची वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. नागपूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एन.व्ही. भास्कर हे अमरावती विभागाचे नवे उपसंचालक म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. यवतमाळ जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभगातील वरिष्ठ भूवैज्ञानिक ए.एम. गायकवाड यांची अकोला जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ त्यांच्या नव्या जागेवर रुजू होण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.