Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वैदर्भीयांची कला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावी -मधुकर इंगोले
नागपूर, १५ जून / प्रतिनिधी

 

विदर्भात अनेक गुणी कलावंत असून त्यांना आजपर्यंत संधी मिळत नव्हती, मात्र सिस्फाने कलाकारांचे मन ओळखून त्यांच्या कलांना वाव आणि प्रोत्साहन दिले आहे. या कलाकारांची कला केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुस्तान पेट्रोलियम कापरेरेशनचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक मधुकर इंगोले यांनी केले.
मुंडले एज्युकेशनल ट्रस्टच्या सेन्ट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट्स (सिस्फा) तर्फे मान्सून बोनाझा या कला प्रदर्शन मालिकेत सिस्फाच्या फाईन आर्टसच्या पेटिंग विभागाचे प्रा. बाबर शरीफ यांच्या ‘सेन्सिबल लाईन्स ऑन द पाथ’ या ड्राईंग आणि पेटिंगचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदेघाटन मधुकर इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्न्ो, संस्थेचे सचिव निखिल मुंडले उपस्थित होते.
बाबर शरीफ यांच्या संवेदनशील रेषा, कलावंताची रेषेवरील पकड, सहजपणे दर्शवितात. अमूर्त शैलीतून वास्तविकतेकडे झुकणारे त्यांचे रेखाटन अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. हे प्रदर्शन १७ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहील. कार्यक्रमाचे संचालन मेघना गोरे यांनी केले. मान्सून बोनांझा या मालिकेत ३१ जुलैपर्यंत विविध कलाकारांचे चित्र व शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेत चंद्रकांत चन्न्ो, प्रा. अरुण दारोकार, प्रा. प्रकाश कावळे, रविप्रकाश सिंह, शशिकांत रेवडे, मिलिंद लिंबेकर, भाऊ दांदडे, ज्योती हेजीब मुक्तानंद नवघरे व शांतीनिकेतनचे अरींदम सरकार यांच्या कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.