Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

सावंतवाडी नगराध्यक्षपदी पल्लवी केसरकर बिनविरोध
अधिकृत घोषणा १९ जून रोजी
सावंतवाडी, १५ जून/वार्ताहर

सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी दीपक केसरकर यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसने पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले नव्हते. नवनिर्वाचित

 

नगराध्यक्षा केसरकर यांनी महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर आपला भर राहील, असे स्पष्ट केले.
सावंतवाडीचे नगराध्यक्षपद महिला (खुल्या) प्रवर्गासाठी राखीव होते. नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, जनता दल एक व काँग्रेस सात असे बळ आहे. काँग्रेसने उमेदवार उभा केला नसल्याने केसरकर यांची बिनविरोध निवड झाली.
प्रश्नंताधिकारी नंदकुमार जाधव यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. याविषयी अधिकृत घोषणा १९ जून रोजी होईल. सावंतवाडी शहराचा पर्यटनदृष्टय़ा विकास करताना स्वच्छता अभियान राबविले जाईल, तसेच महिलांना रोजगारविषयक प्रशिक्षण देऊन रोजगार केंद्र सुरू केले जाईल, असे पल्लवी केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास साधताना रस्ते, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. फळप्रक्रिया, बांबू प्रक्रिया यासाठी महिलांना प्रश्नधान्य देऊन विकास साधला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. कोकम सरबत, आंबा प्रक्रियांसारखे उद्योग महिलांना बचतगटामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच शहराच्या सुजल योजना १३ कोटींचा प्रस्ताव, मोती तलाव सौंदर्यीकरण केले जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.