Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

पैसे खाणाऱ्या लिपिकास पत्रकारांनी पकडले रंगेहाथ
अलिबाग, १५ जून / प्रतिनिधी

‘अभिव्यक्ती समर्थन’ पत्रकार संघटनेच्या ‘प्रत्यक्ष पंचनामा’ उपक्रमान्वये आज येथील रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय ५० रुपये शुल्काबरोबर २०० ते ३०० रुपये अतिरिक्त व बेकायदेशीररीत्या वसूल करणारा कनिष्ठ लिपीक एस़ पी़ सोनावणे यास

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एऩ एस़ नेहुलकर यांच्यासमक्ष रंगेहाथ पकडण्यात यश आल़े
राज्य परिवहन मंडळातील विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अपेक्षित असणारे जिल्हा शल्य चिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्याकरीता हे २० उमेदवार आज जिल्हा रुग्णालयात आले होत़े या प्रमाणपत्राकरीता ५० रुपये शासकीय शुल्क असताना उमेदवारांकडून २०० ते ३०० रुपये अतिरिक्त वसूल करण्याचे काम एस़ पी़ सोनावणे करीत असून, जे उमेदवार हे पैसे देणार नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही, असा दम सोनावणे देत असल्याची तक्रार या उमेदवारांनी लेखी स्वरूपात ‘अभिव्यक्ती’चे राज्य कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड़ रत्नाकर पाटील व जिल्हाध्यक्ष अविष्कार देसाई यांच्याकडे केली़
सोनावणे याने आज सकाळी १०.३० वाजता कामास प्रश्नरंभ केल्यापासून ५० रुपये शुल्काच्या पावती क्रमांक ९०८२७७८ ते ९०८२७८१ या चार पावत्या फाडल्या होत्या़ त्यांचे एकूण २०० रुपये त्याच्या सरकारी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४ हजार ४५० रुपयांची रोकड असल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झाल़े या बेहिशेबी रकमेबाबत डॉ़ नेहुलकर यांनी सोनावणे याच्याकडे खुलासा मागितला असता, ‘मी ५०रुपये शासकीय शुल्काव्यतिरिक्त उमेदवाराकडून २५० ते ३०० रूपये ज्यादा घेतले आहेत’ असे त्याने सर्वासमक्ष मान्य केल़े
आज दाखल करुन घेतलेल्या २० उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे ५० रुपयांप्रमाणे एकूण शासकीय शुल्क एक हजार रुपये होत़े ते या ४ हजार ४५० रक्कमेतून वजा करता शिल्लक राहणारी ३ हजार ४५० रुपयांची बेहिशेबी, बेकायदा व उमेदवारांना नाडून वसूल केलेली रक्कम एका लखोटय़ात सीलबंद करुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ नेहुलकर यांनी ताब्यात घेतली असून, तशी पावती त्यांनी अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेस दिली़
दरम्यान रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र धिवरे यांच्याशी चर्चा करून, याप्रकरणी रुग्णालय सेवा नियमावलीनुसार आरोग्य उपसंचालक डॉ. के.जी.देशमाने यांना कळवून सोनावणे याच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्यात येईल, असे डॉ. नेहुलकर यांनी सांगितले. सोनावणे याच्याकडून तात्काळ हे काम काढून घेऊन ते दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे सोपविण्याची कार्यवाहीही त्यांनी केली.
दरम्यान, ज्या उमेदवारांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात आले आहेत, ते ज्या त्या उमेदवारास परत करण्याची व्यवस्था डॉ. नेहुलकर यांनी करावी, म्हणून ‘अभिव्यक्ती संघटना’ उद्या पाठपुरावा करणार आहे. या सर्व उमेदवारांनी ‘अभिव्यक्ती संघटने’ स धन्यवाद देऊन, भविष्यात आमच्याकडून असा प्रकार कधीही घडणार नाही, असे अभिवचन दिले आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवेतील गलथानपणा यापूर्वीही पत्रकारांनी अनेकदा लोकांसमोर आणला आहे, आता या निमित्ताने या रुग्णालयात लोकांना नाडून त्यांच्याकडून बेकायदा पैसे घेतले जातात या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.