Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

राज्य

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण प्रकल्पांना लागलेली गळती कोणाच्या ‘हितासाठी’?
सावंतवाडी, १५ जून/वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडे असलेल्या २४ पाटबंधारे प्रकल्पांपैकी दोनच प्रकल्पांनी उद्दिष्ट साध्य केले आहे. बाकीच्या प्रकल्पांना गळती सुरू आहे. कोटय़वधी रुपये खर्च पडूनही शेतकऱ्यांना पाणीच मिळत नसणारे हे प्रकल्प दरवर्षी दुरुस्त केले जातात. हा सारा मामला पाटबंधारे विभाग कोणाच्या हितासाठी करीत आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

सावंतवाडी नगराध्यक्षपदी पल्लवी केसरकर बिनविरोध
अधिकृत घोषणा १९ जून रोजी

सावंतवाडी, १५ जून/वार्ताहर

सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पल्लवी दीपक केसरकर यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसने पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले नव्हते. नवनिर्वाचित नगराध्यक्षा केसरकर यांनी महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यावर आपला भर राहील, असे स्पष्ट केले.सावंतवाडीचे नगराध्यक्षपद महिला (खुल्या) प्रवर्गासाठी राखीव होते. नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, जनता दल एक व काँग्रेस सात असे बळ आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सावंतवाडीतील रोग्यांचे हाल
आजारी इस्पितळे

सावंतवाडी, १५ जून/वार्ताहर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २५ पदे रिक्त असल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयीन कर्मचारी यांच्यात वरचेवर ताणतणाव निर्माण होत आहेत. औषध निर्माता वर्ग-३ साठी तीन पदे भरण्यात आली असली तरी त्यातील दोन औषध निर्माता प्रतिनियुक्तीवर मुंबई व पेण येथे काम करीत असूनही त्यांचा पगार मात्र येथील रुग्णालयातून काढण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ पद रिक्त आहे. त्याचा पदभार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याकडे आहे.

साताऱ्यात डॉ. मुळीक यांचे बेमुदत उपोषण सुरू
सातारा, १५ जून/प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे एक खासदार सीबीआयच्या कोठडीची हवा खात असताना साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनचळवळ उभारली असून त्यांच्या नेतृत्वाखाली कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करो या मरोची घोषणा करून बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू केले आहे. उदयनराजे व त्यांचे चाहते कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांच्यासह सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी नगरसेवक भूमाताचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते.

अजित पवार यांच्या पत्नीस न्यायालयाच्या अवमानाबद्दल समन्स
पुणे, १५ जून / प्रतिनिधी

न्यायालयीन खटला प्रलंबित असताना मुळशी तालुक्यातील घोटवडे येथील दहा एकर शेतजमीन खरेदी करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फायर पॉवर अ‍ॅग्रो फार्मस प्रश्न. लिमिटेड कंपनीच्या संचालिका आणि राज्याचे जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिवाणी न्यायाधीश व्ही. व्ही. विध्वंस यांनी समन्स बजावले आहे.

माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी अलंकापुरी सज्ज
आळंदी, १५ जून/वार्ताहर

आषाढ वारीला जाण्यासाठी आळंदीत आलेल्या भाविकांच्या गर्दीने इंद्रायणी नदीकाठ फुलला आहे. उद्या, मंगळवारी माउलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. वारकरी भाविकांसाठी स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी करून भाविकांच्या स्वागतास यंत्रणा सज्ज झाली आहे.आषाढ वारीतील प्रस्थानसाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस ठाणे, आळंदी ग्रामीण रुग्णालय यांनी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनातून सुसंवाद साधून सोहळ्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र परिसरातून आळंदीत आलेल्या वारक ऱ्यांना सेवा-सुविधा पुरेशा प्रमाणात देण्यासाठी तयारी करण्यात आली.

मांडवणे- कराळेवाडी पूल तुटल्यामुळे गावांशी संपर्क खंडित
कर्जत, १५ जून/वार्ताहर

मांडवणे- कराळेवाडी रस्त्यावरील पूल तुटल्यामुळे परिसराशी संपर्क तुटला असून, गेले वर्षभर पुलाचे काम झालेले नाही. या रस्त्यावरून साधी सायकलही जाण्याची सोय नाही. त्यामुळे मांडवणे गावाची सर्व रहदारी कडाव- कर्जतला जाण्यासाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या ‘टाटा रोड- वैजनाथ मांडवणे’ या छोटय़ा साकवावरून सुरू आहे. मात्र हा छोटा साकवही डांबर व सिमेंट उखडल्यामुळे धोकादायक झाला आहे. या साकवाला लागून असलेल्या रस्त्यावर मोठा व अवघड असा चढ असल्याने आजपर्यंत चढावावर रिक्षा व इतर वाहनांचे अपघात झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मांडवणे गावाचा संपर्क तुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. सदर साकवाला दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या अ‍ॅप्रश्नेच रोडचे कामही गेले चार वर्षे न केल्याने या पावसाळ्यात साकव वाहून जाण्याची शक्यता आहे.