Leading International Marathi News Daily

मंगळवार, १६ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानचा उपान्त्य फेरीत प्रवेश
लंडन, १५ जून/ पीटीआय

सलामीवीर कामरान अकमलच्या स्फोटकी अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आर्यलडला ३९ धावांनी पराभूत करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाने पाकिस्तानने आर्यलडवर २००७ च्या विश्वचषकामधील पराभवाचा बदला घेतला असून ‘एफ’ गटातून दक्षिण

 

आफ्रिकेबरोबर उपान्त्य फेरी गाठली आहे.
अकमलने साकारलेल्या ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना १५९ धाव करता आल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे आर्यलडचे काहीही चालले नाही.
फॉर्मात असलेल्या सईद अजमलने १९ धावांत ४ विकेट्स घेतल्या तर वेगवान गोलंदाज उमर गुलने १९ धावांमध्ये दोन विकेट्स मिळविल्या. पण या आक्रमक गोलंदाजीचा सामना करत कर्णधार विल्यम्स पोरटर्सफिल्डने ४० धावांची खेळी साकारली.
आजच्या कामगिरीमुळे गुल आणि अजमल यांनी विश्वचषकातील गोलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.
पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सतत ‘फ्लॉप’ ठरत असलेल्या समान बट्ट ऐवजी आज शाहझैब हसनला (२३) सलामीला पाठवले आणि त्यानेही संघाला चांगली सुरूवात करून दिली.
त्यानंतर आलेल्या शाहिद आफ्रिदीनेही (२४) धावांची गती वाढविण्याचे काम केले. एकीकडे खेळपट्टीवर उभ्या असलेल्या अकमलने पाच चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५७ धावांची खेळी साकारत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. तर अखेरच्या षटकांमध्ये मिसाबाह-उल-हक (२०) आणि अब्दुल रझ्झाक (१५) यांनी जलदगतीने धावा जमविल्याने पाकिस्तानला १५९ धावा करता आल्या.
पाकिस्तान- कामरान अकमल त्रिफळाचीत गो. जॉनस्टन ५७, शाहझैब हसन झे. मॅक् कलन गो. कूसॅक २३, शाहिद आफ्रिदी झे. मूनी गो. मॅक् कलन २४, युनूस खान त्रिफळाचीत गो. वेस्ट १०, मिसबाह-उल-हक झे. ऑब्रायन गो. मॅक् कलन २०, अब्दुल रझ्झाक नाबाद १५, शोएब मलिक नाबाद ४, अवांतर ६, एकूण २० षटकांत ५ बाद १५९.
बाद क्रम- १-३८, २-७८, ३-१०२, ४-१३३, ५-१४१.
गोलंदाजी- रॅन्किन ४-०-११-०, जॉनस्टन ४-०-४५-१ , कूसॅक ४-०-४१-१, वेस्ट ४-०-३३-१, मॅक् कलन ४-०-२६-२.
आर्यलड- विल्यम्स पोरटर्सफिल्डने झे. युनूस खान गो. सईद अजमल ४०, नील ऑब्रायन झे. व गो. मोहम्मद आमीर ७, पॉल स्टिर्लिग त्रिफळाचीत गो. आफ्रिदी १७, केव्हिन ऑब्रायन यष्टीचीत कामरान अकमल गो. सईद अजमल २६, जॉन मूनी झे. अब्दुल रझ्झाक गो. सईद अजमल २, ट्रेन्ट जॉनस्टन त्रिफळाचीत गो. गुल ०, अ‍ॅन्ड्रय़ू व्हाईट त्रिफळाचीत गो. गुल ५, अ‍ॅलेक्स कूसॅक यष्टिचीत कामरान अकमल गो. सईद अजमल २, कायले मॅक् कलन नाबाद २, रॅगन वेस्ट धावचीत (गुल) १, बॉन्ड रॅन्किन नाबाद ५, अवांतर १५, एकूण २० षटकांत ९ बाद १२०.
बाद क्रम- १-१३, २-४२, ३-८७, ४-९३, ५-९९, ६-१०८, ७-११०, ८-११०, ९-१११.
गोलंदाजी- आमीर ४-०-१९-१, रझ्झाक ३-०-१८-०, आफ्रिदी ४-०-२६-१, अजमल ४-०-१९-४, मलिक १-०-११-०, गुल ४-०-१९-२.