Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

किशोरी आवाडे व मेघा चाळके यांची अटीतटीची लढत रंगणार
इचलकरंजी नगराध्यक्षपदाची शनिवारी निवडणूक
इचलकरंजी, १६ जून / वार्ताहर

आवाडे गटाच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी पाहणारी नगराध्यक्षपदाची निवडणूक २० जून रोजी होणार असून, आज काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यमान नगराध्यक्षा श्रीमती किशोरी आवाडे,

 

अशोकराव आरगे यांचे तर विरोधी शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार श्रीमती मेघा चाळके तसेच सागर चाळके यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
काँग्रेस पक्षाकडून चार, तर विरोधी आघाडीकडून ९ असे एकूण १३ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
आवाडे गटातील अर्थात काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांनी फुटीचा मार्ग स्वीकारल्यामुळे यंदा प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूक अतिशय अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. शहर विकास आघाडीच्या वतीने श्रीमती मेघा चाळके तर सत्तारूढ आघाडीच्या वतीने श्रीमती किशोरी आवाडे यांच्यातच या पदासाठी लढत होणार आहे. श्रीमती आवाडे आणि श्रीमती चाळके यांचे उमेदवारी अर्ज वैध असल्याचे प्रश्नंताधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
दिनांक २० जून रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी आघाडीकडे ३२ आणि सत्तारूढ काँग्रेस पक्षाकडे २५ असे संख्याबळ आहे. दरम्यान किशोरी आवाडे व सुनील महाजन यांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून अडीच वर्षाची मुदत आज संपुष्टात आली. प्रश्नंताधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याकडे कार्यभार राहणार आहे.