Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी सतीश मुळे यांची निवड निश्चित
पंढरपूर, १६ जून/वार्ताहर

पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सतीश दादासाहेब मुळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाच बाकी आहे, तर उपनगराध्यक्षपदासाठी दयानंद वायदंडे यांचा

 

एकच अर्ज आला आहे.
विद्यमान नगराध्यक्ष दगडू धोत्रे यांची मुदत १९ जून रोजी संपत आहे. नगरपालिकेमध्ये ३३ पैकी २८ नगरसेवक शहर विकास आघाडी (परिचारक) गटाचे आहेत. अर्ज भरण्याच्या (१५ जून) शेवटच्या दिवशी सर्वानुमते नगराध्यक्षपदासाठी सतीश मुळे यांचे नाव सुचवण्यात आले.
सतीश मुळे हे नगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक पक्षनेते असून शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांचे विश्वासू नगरसेवक आहेत. गेली १८ वर्षे नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून तसेच आमदार सुधाकर परिचारक यांचे ते कट्टर समर्थक म्हणून सर्वाना परिचित आहेत.
नगराध्यक्षपदासाठी सतीश मुळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड निश्चित असून १९ जून रोजी रीतसर घोषणाच बाकी आहे. दयानंद वायदंडे यांना उपनगराध्यक्ष म्हणून पुन्हा संधी देण्यात आली असून याबाबतची घोषणाच बाकी आहे. नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग घंटी पापरकर, सुनील सर्वगोड असे अनेक इच्छुक होते. परंतु आगामी विधानसभा लक्षात घेऊन नगराध्यक्षपदी सतीश मुळे यांची वर्णी लागली आहे.