Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाईच्या नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली
वाई, १६ जून/वार्ताहर

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष डॉ. मेधा घोटवडेकर यांनी विरोधी जनकल्याण आघाडीकडून उमेदवारीअर्ज दाखल केल्याने आणि त्यांनीच तीर्थक्षेत्र आघाडीच्या वतीने शोभा रोकडे यांना सूचक म्हणून राहिल्याने एकूणच या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीत

 

चार उमेदवारांनी पाच उमेदवारीअर्ज दाखल केले.
वाई नगरपालिकेत तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता आहे. या आघाडीचे सात अपक्ष दोन भाजप एक व जनकल्याण आघाडीचे नऊ सदस्य आहेत. अपक्ष नगरसेवक राजाभाऊ खरात नीलिमा खरात व भाजपच्या मेधा घोटवडेकर यांनी तीर्थक्षेत्र आघाडीला
पाठिंबा दिल्याने राजाभाऊ खरात
नगराध्यक्ष तर भाजपच्या डॉ. घोटवडेकर उपाध्यक्ष म्हणून मागील अडीच वर्षात कार्यरत आहेत.
आज पुढील अडीच वर्षासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याच्या दिवशी डॉ. घोटवडेकर, जनकल्याण आघाडीच्या सुरेखा सावंत, तीर्थक्षेत्र आघाडीच्या वतीने नीलिमा खरात व शोभा रोकडे यांनी उमेदवारीअर्ज मुख्याधिकारी विनायक वाठारे यांच्याकडे दाखल केले.
प्रश्नंताधिकारी कुमार खैरे यांच्यासमोर झालेल्या छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. डॉ. घोटवडेकर यांनी उमेदवारी दाखल करतानाच तीर्थक्षेत्र आघाडीच्या रोकडे यांनाही सूचक म्हणून सही केली आहे.
या निवडणुकीत आम्ही चमत्कार घडविणार असल्याचे मदन भोसले प्रणित जनकल्याण आघाडीचे सचिव शेखर शिंदे व नगरसेवक नंदकुमार खामकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले.