Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

जयप्रकाशद्वयींच्या प्रतिष्ठेची निवडणूक
तुकाराम झाडे

जिल्ह्य़ातील वसमत विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मतदारसंघात भाजपा-सेना युतीच्या काळात डॉ. जयप्रकाश मुंदडा तर आघाडीची सत्ता असताना विद्यमानमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने विधानसभेची निवडणूक या दोन जयप्रकाशच्या प्रतिष्ठेची बनली आहे.पुनर्रचनेत वसमत मतदारसंघातील चुडावा सर्कलमधील सुमारे २० गावे इतरत्र गेली तर जिंतूर मतदारसंघातील ३१ गावांचा वसमतमध्ये समावेश झाला. जिंतूर सर्कलमधून आलेल्या गावावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे सुभाष वानखेडे यांना ६९३९१ तर सूर्यकांता पाटील ४९२४२ यांना मतदान झाले.