Leading International Marathi News Daily

बुधवार, १७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

उशिरा आलेल्या १५ कर्मचाऱ्यांना नोटिसा
नांदेड, १६ जून/वार्ताहर

कर्मचारी उशिरा येतात अशा तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. एकूण १५ कर्मचारी

 

उशिरा आल्याचे आढळून आले. या सर्वाना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय अशा अनेक ठिकाणी कर्मचारी उशिरा येतात तसेच कार्यालयीन वेळात बाहेर फिरतात अशा तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या होत्या. विभागप्रमुख वारंवार सूचना करूनही कर्मचारी दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आज श्री. परदेशी यांनीदहा वाजता कार्यालय गाठले. त्यांनी सर्वच विभागांना भेट दिली. या मोहिमेमुळ टेबलावर अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या फायली स्वच्छ करण्यात आल्या. तसेच कार्यालयात स्वच्छता ठेवण्यात आली.
श्री. परदेशी यांनी वेगवेगळ्या विभागातील हजेरीपट तपासले. वेगवेगळ्या विभागाचे १५ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. ते सर्व उशिरा कार्यालयात दाखल झाले. त्या सर्वाना नोटीस बजावण्यात आली.
जिल्हाधिकारी येण्यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी व्ही. एच. अरगुंडे, उपजिल्हाधिकारी कुलकर्णी, जयंत दांडेगावकर आदी कार्यालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आज केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे.